मनमाड, दि. २६ मार्च २०२५: धोटाने (मनमाड) येथील इंडियन ऑइल बॉटलिंग प्लांटमध्ये कार्यरत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या सदस्यांना गेल्या काही दिवसांपासून ठेकेदारांकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्यांचा निपटारा करण्यासाठी कामगारांनी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर, आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ फेब्रुवारी रोजी इंडियन ऑइल बॉटलिंग प्लांटच्या व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. व्यवस्थापकांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करून त्या अमलात आणल्या.
या यशस्वी प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेच्या सदस्यांनी मनमाड येथील आमदार कार्यालयात शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करून कामगारांनी आभार मानले. या प्रसंगी सेनेचे अध्यक्ष अनिल कुनगर, उपाध्यक्ष करन बहोत, सचिव तुकाराम गायकवाड, खजिनदार अंतुन झाल्टे, तसेच अनिल डघळे, भगवान मिसाळ, कैलास पवार, नरेश उगले आणि शैलेन्द्र जगताप उपस्थित होते.
कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून, या घटनेने शिवसेनेची कामगारांप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या