Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

प्रकाश आंबेडकरांचा सौगात-ए-मोदी' किटवर घणाघात; म्हणाले, "हाथ रक्ताने माखलेले,आता कीट देताय?"

 

प्रकाश आंबेडकरांचा सौगात-ए-मोदी' किटवर घणाघात; म्हणाले, "हाथ रक्ताने माखलेले,आता कीट देताय?"

  रमजान ईदेच्या निमित्ताने भाजपकडून मुस्लिम बांधवांसाठी 'सौगात-ए-मोदी' किट वाटपाच्या घोषणेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी तीव्र टीका केली आहे. "ज्यांचे हात मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग आणि गुजरात हत्याकांडाच्या रक्ताने माखलेले आहेत, तेच आता किट देत आहेत," असा घणाघाती आरोप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला आहे. या किट वाटपावरून त्यांनी भाजपच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मुस्लिम मौलवींच्या गप्प राहण्यावरही सवाल उपस्थित केला आहे.

 प्रकाश आंबेडकरांने हल्लाबोल करतांना सौगात-ए-मोदी' किट सोबत मुस्लिम मौलवींच्या मौनावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
दि. 27 मार्च 2025: रमजान ईदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) देशभरातील 32 लाख गरीब मुस्लिम बांधवांसाठी 'सौगात-ए-मोदी' किट वाटपाचा मोठा कार्यक्रम जाहीर केला आहे. या किटमध्ये सेवई, खजूर, सूटचे कापड, ड्राय फ्रूट्स आणि अन्य आवश्यक वस्तूंचा समावेश असून, हा उपक्रम भाजपच्या अल्पसंख्यक मोर्चामार्फत राबवला जाणार आहे. मात्र, या घोषणेला वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार आक्षेप घेत टीका केली आहे.  

या वेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटले, "ज्यांचे हात मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग, गुजरात हत्याकांड, बिलकीस बानो प्रकरण, वक्फ बोर्डावर अतिक्रमण, CAA-NRC आणि बुलडोझरच्या कारवायांनी रक्ताने माखलेले आहेत, तेच आता 'सौगात-ए-मोदी' किटच्या नावाखाली मुस्लिमांना शुभेच्छा देऊन किट देत आहेत. हे केवळ राजकीय स्वार्थाचे प्रदर्शन आहे." त्यांनी या किट वाटपाला "मतांसाठी लांगूलचालन" असे संबोधत भाजपच्या हेतूंवर शंका व्यक्त केली. "अचानक हे किट वाटप का? 22 टक्के हिंदू देश सोडून जात असताना भाजपला मुस्लिमांची आठवण का झाली?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  

भाजप पुरस्कृत घटनांचा उल्लेख

आंबेडकर यांनी भाजपच्या काळात मुस्लिम समुदायावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. त्यांनी मुस्लिमांच्या मॉब लिंचिंगच्या अनेक घटना, घडल्या तसेच 2002 च्या गुजरात हत्याकांडातील दोषींना सोडण्याचा निर्णय, बिलकीस बानो प्रकरणातील आरोपींची सुटका करण्यात आली. वक्फ बोर्डाच्या जमिनींवर अतिक्रमण,वक्फ बोर्ड नवीन कायदा. तसेच CAA-NRC च्या नावाखाली निर्माण झालेली भीती, बुलडोझरचा वापर आणि धार्मिक विटंबनेच्या घटनांचा थेट उल्लेख केला. "या सर्व प्रकरणांत भाजपच पुरस्कर्ता आहे. मग आता ही किट देऊन कोणता संदेश द्यायचा आहे?" असा थेट सवाल त्यांनी केला.  
  
प्रकाश आंबेडकर यांनी मौलवींच्या मौनावर सवाल उपस्तितीत करून मुस्लिम मौलवींच्या गप्प राहण्यावरही बोट ठेवले. "निवडणुकीच्या वेळी फतवा काढणारे मौलवी आता का गप्प आहेत? 'सौगात-ए-मोदी' किट घ्यायची की नाही, यावर मौलवींनी आपली भूमिका स्पष्ट करावी," असे आवाहन त्यांनी केले. "मुस्लिम समाजाला या सर्व घटनांवर बोलण्याची आणि आपली बाजू मांडण्याची गरज आहे. मौन बाळगणे हा पर्याय नाही," असेही ते म्हणाले. असे 
प्रबुद्ध भुमी या फेसबुक प्रजवर प्रकाशित करण्यात आलेले आहे 

  
दुसरीकडे, भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी या उपक्रमाचे समर्थन केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी 140 कोटी भारतीयांचे पंतप्रधान आहेत. रमजान आणि ईदेच्या निमित्ताने गरीब मुस्लिमांना मदत करणे हा आमचा उद्देश आहे. यातून सांप्रदायिक सौहार्द वाढेल," असे त्यांनी म्हटले. भाजपच्या म्हणण्यानुसार, ही किट देशभरातील 32,000 मशिदींमार्फत वाटली जाणार असून, प्रत्येक किटची किंमत 500 ते 600 रुपये आहे.   

या उपक्रमाला समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेससह इतर विपक्षी पक्षांनीही विरोध दर्शवला आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी याला "राजकीय स्वार्थ" म्हटले आहे, तर सपा खासदार अफजाल अंसारी यांनी "मुस्लिमांना सौगात नाही, फक्त न्याय हवा," असे मत व्यक्त केले.  
  
'सौगात-ए-मोदी' किट वाटपाचा हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या टीकेने या उपक्रमाला नवे वादग्रस्त वळण मिळाले असून, मुस्लिम समाज आणि मौलवी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या