Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुस्लीम लायब्ररी मध्ये वाचन संकल्प दिवस महाराष्ट्र साजरा करण्यात आला

 

मुस्लीम लायब्ररी मध्ये वाचन संकल्प दिवस महाराष्ट्र साजरा करण्यात आला 

  मनमाड. मुस्लीम लायब्ररी आझाद रोड मनमाड या वाचनालया मध्ये वाचन संकल्प दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी चा कथा. काव्य वाचनात चार कार्यक्रम संपन्न झाला 

या कार्यक्रमांचे अध्यक्ष ईकरा हायस्कूल चेअरमन डॉ ए जी कुरेशी होते व प्रमुख पाहुणे म्हणून हाजी जानी सेठ, नजमुल हुसेन मनसुरी, हाजी नजीर पठाण होते

या कार्यक्रमा चे प्रस्तावीक वाचनालयाचे सेक्रेटरी. अब्दुल कादर भाई यांनी केले
यावेळी ईकरा हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री अफजल सर व रफत मॅडम आणि बिल्कीस मॅडम यांनी आलेल्या विद्यार्थ्यांना काव्य कथन वर मार्गदर्शन केले व काव्य कथन चे उदाहरण देऊन माहीती दिली वाचनावर मार्गदर्शन केले वाचनाची आवड व्हावी असे आपल्या भाषणात म्हणाले 
 वाचक वर्ग व प्रायमरी स्कूल चे विद्यार्थी उपस्थीत होते 
कार्यक्रमा चे सुत्रसंचलन एम सलीम अहेमद यांनी केले व सेक्रेटरी कादर भाई आभार व्यक्त केले व कार्यक्रम संपला असं जाहीर केलं

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या