Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रयतेचे आमदार सुहास अण्णा कांदे ॲड. अर्चना धवलचंद्र आढाव.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.

 रयतेचे आमदार सुहास अण्णा कांदे ॲड. अर्चना धवलचंद्र आढाव.

  नांदगाव . जीवन म्हणजे काय हो ?जेव्हा एखादा माणूस आपल्या एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन जीवनाचे उद्दिष्टय ठरवतो तेव्हा तो या भात भाकरीच्या विश्वात वावरणाऱ्या सामान्य माणसापेक्षा वेगळा असतो. जीवन म्हणजे स्वत:साठी जगने नाही तर जे उद्दिष्टय ठरवले आहे ते पूर्ण करणे मग त्यासाठी त्याच्या मार्गात येणारी सगळी संकटे, सगळी दुख: हसत हसत पार करण.  

आणि असेच फुले, शाहू, आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, अहिलयादेवी होळकर यांच्या कार्याचा खारीचा वाटा म्हणून काम करणारे नांदगाव मतदार संघाचे लोकप्रिय, कार्यसम्राट, विकासपुरुष आणि रयतेच्या मनावर राज्य करणारे आमदार म्हणजे सुहास अण्णा कांदे होय. नांदगाव मतदारसंघांमध्ये महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन मतदारसंघात प्रथमत: ग्रामीण भागातील विद्यार्थी – विद्यार्थिनीसाठी शिक्षणाची संधी गुरुकुल आय टी आय, गुरुकुल पॉलीटेक्निक च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच परदेशातही नोकरीची संधी चे प्रवेशद्वार उघडून दिले आणि समाजकार्याची मुहूर्तमेढ रोवली. तसेच नांदगाव तालुका नेहमी दुष्काळ ग्रस्त असतो अशा परिस्थितीत तालुक्यातील सर्व गावांना टॅकर ने पाणी पुरवठा करणे, अॅम्ब्युलेन्स ची सुविधा पुरवणे इतरही अनेक कामे त्यांनी केली आणि सदैव करण्यासाठी तत्पर असतात. कोरोंना काळात दिवसरात्र एक करून लोकाना मदत पोहचवली.

      “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे “ या उकतीनुसार कोणतीही गोष्ट तडीस न्यायची असेल, तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम हे आलेच. समाजकार्यात स्वताला घडवण्याबरोबरच आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना देखील मोठे करणारे आणि सोबतच आपल्या जनतेसाठी 24 तास काम करणारे नेते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. आणि या तीलच एक असे नांदगाव मतदार संघाचे आमदार म्हणजे सुहास आण्णा. डोळ्यावर काळा चश्मा न लावणारे आणि गाडीच्या खिडकीच्या काचा सदैव खाली ठेवणारे आमदार. असे हे आमदार तालुक्यातील सर्वच समाजातील जनतेला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. याचे कारणही तसेच आहे कारण ते कोणत्याही एका समाजासाठी काम करत नसून समाजातील सर्वच घटकांसाठी “माणुसकी हाच खरा धर्म” असे मानून समाजात सक्रिय आहेत आणि असे असेल तेव्हाच समाजातील रंजल्या –गांजल्या सामाजिक घटकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीची भावना निर्माण होते.

      नांदगाव मतदार संघ विधानसभेचा २०१९ चा विजय असो नाहीतर २०२४ चा विजय असो दोन्ही वेळेस दिग्गज उमेदवार समोर असताना म्हणजे दोनवेळा विधानसभेवर निवडून आलेले आमदार पंकज भुजबळ असतील किंवा खासदार समीर भुजबळ असतील यांचा लढवय्या वृत्तीने पराभव केला आणि या वर्षाची निवडणूक तर कधी नव्हे ती अटीतटी ची झाली आणि “ न भूतो न भविष्यती” ८९,८७४ एवढ्या प्रचंड फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. याला कारण ही तसेच आहे, आपण जनतेच्या विकास कामांसाठी आहोत या जाणिवेने आमदार साहेबांनी विकास कामांचा धडाका लावला, कधीही न सुटणारा मनमाड शहराचा पाणी प्रश्न हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे नेण्याची वाटचाल सुरू केली. मनमाड शहरातील महापुरुषांचे पुतळे, नांदगाव शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक आणि आशियाई खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी चे अनावरण यांच्याच प्रयत्नांनी शक्य झाले. मनमाड नांदगाव शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये रस्ते, गटारी आणि विकासाची कामे फक्त आणि फक्त यांच्याच कार्यकाळात झाली. मनमाड शहरात भव्य दिव्य अशा स्टेडियम ची निर्मितीचे काम ही सुरू असून पूर्णत्वाकडे जात आहे मनमाड शहरात भव्य दिव्य अशा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या कामाचा शुभारंभ झाला. नांदगाव नगरपालिके साठी सुद्धा नूतन इमारती चे काम होणार आहे. मनमाड शहरातील बस स्थानकामध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस स्थानकांच्या कामांचंही शुभारंभ करण्यात आला. नांदगाव विधानसभा मतदार संघातील येसगांव (बू) ता मालेगाव या गावातील एका व्यक्तीच्या झोपडीला आग लागून त्यांचा पूर्ण संसार जळून खाक झालेला असताना आमदार साहेबांनी तात्काळ संबंधित कुटुंबाला संपूर्ण संसारोपयोगी वस्तु देऊन त्यांचे पुनर्वसन केले तसेच पूरग्रस्त कुटुंबाचे सुद्धा पुनर्वसन केले.

      मनमाड MIDC साठी मान्यता मिळवणे हे मनमाडकरांसाठी संजीवनी बुटी पेक्षा कमी नाही आणि हे औद्योगिक वसाहती साठी मान्यता मिळवून आणण्याचे काम आण्णा साहेबांनी झटक्यात केले. 56 खेडी वरुण 78 खेडी पाणी योजना करून गावा गावात , घरा घरात लवकरच पाणी पोहचनणार आहे. “आमदार आपल्या दारी” संकल्पनेतून मोफत रेशनकार्ड, मोफत शासकीय दाखले घरबसल्या वितरित केले. अनेक सभामंडप बांधली. नांदगाव तालुक्यातील शिवभक्तांसाठी शिवमहापुरान आयोजित केले यावेळी शिवमहापुरान तसेच अन्नछत्राचा लाखों शिवभक्तांनी लाभ घेतला. पावसामुळे मनमाड शहरातील दत्त मंदिर येथील पूल वाहून गेला असता आमदार साहेबांनी तात्काळ निधी उपलब्ध करून पूलाची पुनर्निर्मिती केली. तसेच मनमाड येथील येवला रोड वरील पुलाचे काम लवकर पूर्ण करून मनमाड करांची गैरसोय दूर केली.

      येणाऱ्या पाच वर्षात प्रत्येक घरात बेरोजगारासाठी रोजगार आणि महिलाना व्यवसायाची संधि उपलब्ध असणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेती तिथे पाणी असणार आहे. मेडिकल इंजिनिअरिंग करिता उच्च शिक्षणाच्या सोई सुद्धा उपलब्ध असणार आहे.

असा हा आमदार जनते सोबत 24 तास संपर्कात असतो. कुठल्याही शासकीय निधीची वाट न बघता प्रसंगी स्वतच्या खिशातून कामे करतात . तालुक्यातील कोणताही विकास किंवा कोणतेही प्रलंबित प्रश्न असतील जे गेल्या ५० वर्षात भल्या भल्या राजकीय नेत्यांना जमले नाही ते आण्णा साहेबांनी करून दाखवले. आणि तेही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना .... शेवटी एवढेच
   
"धनुष्यातला तीर तुझा तो गेला जनतेच्या ह्रदयातुनी, 
वचन पुर्तीचा वसा घेऊनी मनी,
लवकर घेतले विकासकामे करूनी, 
चंद्रासम स्वच्छ व्यवहार असूनी, 
द्राक्षासम गोडवा भासे जणू तुझ्या वचनातुनी"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या