Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

हिसवळ बु: येथील अतिक्रमण रोखण्यासाठी १८ जून पासून आरटीआय कार्यकर्ते श्री. लक्ष्मण बोगीर यांचे बेमुदत उपोषण

 


नांदगाव वार्ताहर - तालुक्यातील हिसवळ बु: येथील रहिवासी यथा आर टी आय कार्यकर्ते लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांनी दि. १८ जून पासून हिसवळ बु: येथील अतिक्रमण रोखण्यासाठी बेमुदत उपोषण सुरु करण्याचा इशारा तीव्र निवेदनाद्वारे संबंधित कार्यालयास दिलेला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिसवळ बु: येथील ग्रामपंचायतचे संगणक ऑपरेटर सोपान शिरसाठ याने त्यांचे स्वतःचे घरं नंबर २३४ च्या मागील ग्रामपंचायतच्या जागेवर पाया खोदून घराचे बांधकाम सुर केलेले आहे. सदर बाबतीत बोगीर यांनी मागील वर्षी च दि. 7/9/2023 रोजी सदर अतिक्रमण रोखण्याबाबत ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयास अर्ज केले होते. त्यामुळे सदर अतिक्रमण थांबवण्यात आले होते.

परंतु ८-१० महिन्याच्या कालावधीनंतर आता पुन्हा त्या व्यक्तीने त्याच ठिकाणी बांधकाम करण्यास सुरुवात केल्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामपंचायत चे पदाधिकारी च सदर व्यक्तीला अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देता की काय असा प्रश्न ??? निर्माण झालेला आहे. त्यामुळे श्री. बोगीर यांनी सदर बाबतीत हिसवळ बु: येथेच ज्ञानेश्वर माऊली मंदिरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून अतिक्रमण न रोखल्यास सदर ग्रामपंचायत बरखास्तची मागणी केलेली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच संबंधित कार्यालयास दिलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या