Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शेतकऱ्यांन उत्कृष्ट दर्जाचे खते-बियाने मिळण्यासाठी उपयोजना करावी - दीपक पाचपुते



शेतकऱ्यांन उत्कृष्ट दर्जाचे खते-बियाने मिळण्यासाठी उपयोजना करावी - दीपक पाचपुते.

अहमदनगर : या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात उत्कृष्ठ दर्जाचे खते-बयाणे मिळावे या करिता उपयोजना

करावे. कारण वर्ष २०२० साली मराठवाड्यात बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. विशेषतः अहमदनगर जिल्हातील शेतकरी दुबार पेरणीमुळे प्रचंड संकटात सापडला होता. विशेषतः शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे उत्कृठ दर्जाचे मिळणे गरजेचे आहे व खते-बियाणे उपलब्ध असताना सुद्धा ती शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही व्यापारी खते व बियाणे एकाच वेळेस घेणे अनिवार्य करत असतात. नाही तर युरिया सारखे खते उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना देत नाहीत. याची पुढील काळात प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे व बोगस खते-बियाणे विक्रीविरोधात तालुकानिहाय भरारी पथकांची पथकामार्फत दोषी विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते जिल्हा अध्यक्ष ज्ञानमाता सहभागी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह यांनी निवेदनाद्वारे केली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या