Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मानव अधिकार रक्षक मंच तर्फे (बाल विवाह ) अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला आहे,

 

मानव अधिकार रक्षक मंच तर्फे (बाल विवाह ) अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला आहे.

मनमाड :- दि 22/05/2025 रोजी रामेश्वर नामदेव हरण रा, जैपुरवाडी,खंडाळा, जिल्हा हिंगोली हा व्यक्ती दि 22/05/2024 रोजी दुपारी मनमाड शहरात आम्हाला भेटला व संगितले की माझी 14 वर्षीय भाची आहे त्याच्या वडिलांना मनमाड शहरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचे नातेवाईक या लोकांनी 200.000 दोनलाख रुपये देऊन त्याला कुंदलगाव जवळील शेतमळ्यात दि 20/05/2024.
रोजी बळजबरीने अल्पवयीन मुलीचे बाल विवाह केलेला आहे, मी त्या अल्पवयीन मुलीचे लग्नास विरोध केलं असता त्या लोकांनी मला एका खोलीत कोंडून दिले होते, दोन दिवसा नंतर बुधवारी एक गणेश नामक व्यक्ती पूर्ण नाव माहित नाही त्यांनी मला खोलीचे लोक खोलून खोली मधून सुटका केली,


मी दि 22/05/2024 रोजी आज मनमाड शहर पोलीस ठाणे येथे गेलो असता त्यांना सर्व घटना संगितली परंतु त्यांनी माझी तक्रार घेतली नाही नंतर मी DYSP कार्यालय मनमाड येथे गेलो तेथे देखील माझी तक्रार घेतलेली नाही तेथे हे सर्व ऐकत असलेले एक व्यक्तीने मला तुमचे नाव सांगितले व तुमचे नंबर दिले आहे.
तुम्ही त्या 14 वर्षीय अल्प वयीन मुलीची सुटका करण्यासाठी माझी कायदेशीर मदत करा मला त्यांनी विनंती केली व दि 20/05/2024 रोजी झालेले लग्नाचे हे फोटो व्हिडीओ दाखविले व मला फोटो व्हिडिओ देखील दिले, त्या वेळी आमचे मित्र कादीर शेख उपस्थित होते,
 आम्ही रामेश्वर नामदेव हरण यांना आमचे संघटनेला लेखी तक्रार देण्यास सांगितले त्या वर टायपिंग वाल्या कडून त्यांनी त्याची लेखी तक्रार लिहून घेतली व त्यावर त्याची स्वाक्षरी व डाव्या हाताचे अंगठे देखील दिले व भविष्यात त्यांनी आपल्या दिलेल्या तक्रारीवर कायम राहवं म्हणून त्याचे एक व्हिडीओ देखील बनविले


त्यांनी दिलेल्या तक्रार नुसार आम्ही मानव अधिकार रक्षक मंच आमचे संघटने तर्फे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग दिल्ली व राष्ट्रीय महिला आयोग दिल्ली यांना ऑनलाईन लेखी तक्रार केली.
परंतु रामेश्वर नामदेव हरण हा व्यक्ती हा अचानक गायब झाला आम्ही त्याचा शोध घेतला परंतु तो आम्हाला सापडला नाही,
दि 23/05/2024 रोजी रामेश्वर नामदेव हरण या व्यक्तीने मला नवीन मोबाईल नंबर वरून फोन करून सांगितले की मनमाड शहरातले एका राजकीय नेते लोक माझ्या लागलेले आहे, त्या लोकांनी मला गाठून जेथे तक्रार टाईप केली होती तेथे मला नेऊन, तुम्ही खोटं केल असे लेखी दया असे म्हणाले. आपण खोटं केलंच नाही तर काय लिहून द्यायचं माझ्यावर ते दबाव आणता हेत मला तुमचे सपोर्ट पाहिजे, म्हणून मी तुम्हाला फोन केल,
त्याला आम्ही विचारणा केली की कोण कोण दबाव आणतोय काय नाव त्यांच, त्यावर त्यांनी मला शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव सांगितले, मी त्यांना अजून कोणी असे विचल्या नंतर त्यांनी
प्रतिष्ठित व्यक्तीचे व त्याचे नातेवाईकांचे नावे सांगितले.

आम्ही रामेश्वर नामदेव हरण यांना विचारले की ते लोक काय सांगत आहे त्यावर त्यांनी सांगितले की ते लोक सांगत आहे की आम्ही तुला दहा वीस हजार देतो तु तक्रार मागे घे, पण मला पैशे नाही लागत आहे,



प्रतिष्ठित व्यक्ती हे मला तक्रार मागे घे नाहीतर तुझी तंगडी तोडतो अशी धमकी दिली आहे, मला समोरच्या लोकांनी धरले होते. मी कसा बसा त्यांच्या तावडीतुन सुटलो आहे, तुम्ही मला भेटा व त्या 14 वर्षीय मुलीला न्याय मिळवून दया त्यांनी सांगितले की मी मनमाड शहरात तुफान चौक येथे लपवून बसलो आहे, वगैरे वगैरे असे रामेश्वर नामदेव हरण यांनी मला फोन वर संगितले आहे,
 आम्ही त्या ठिकाणी मानव अधिकार रक्षक मंच चे एक कार्यकर्ते तेथे पाठवून त्याला घेऊन येण्यास सांगितलं, मी मनमाड शहरात आलेवर त्यास भेटलो त्यांनी परत मला तीच स्टोरी सांगितली की मला समोरच्या लोकांनी धरले होते. मी कसा बसा त्यांच्या तावडीतुन सुटलो आहे, तुम्ही त्या 14 वर्षीय मुलीला न्याय मिळवून दया,
 आम्ही त्यास घेऊन DYSP साहेब मनमाड यांच्या कार्यालयात गेलो तेथे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब मालेगाव हे देखील आलेले होते, रामेश्वर नामदेव हरण यांनी DYSP साहेब मनमाड यांना सर्व प्रकरण सांगितले कारवाई करण्याची मांगणी केली आम्ही अप्पर पोलीस अधीक्षक साहेब मालेगाव यांना देखील सर्व प्रकरणाची माहिती दिली,
अप्पर पोलीस अधीक्षक साहेब मालेगाव यांनी पोलीस निरीक्षक साहेब चांदवड पोलीस ठाणे यांनी फोन करून योग्य कारवाई करण्याचे सूचना दिले, वअप्पर पोलीस अधीक्षक साहेब मालेगाव यांनी आम्हाला आपणास भेटण्यास सांगितले
त्या नुसार आम्ही रामेश्वर नामदेव हरण या व्यक्तीस घेऊन आपल्या पोलीस ठाणेत हजर झालो रामेश्वर नामदेव हरण यांनी 
पोलीस निरीक्षक साहेब चांदवड
समक्ष देखील ती घटना व झालेले प्रकार हे संगितलेले आहे,

पोलीस निरीक्षक साहेब चांदवड आम्हाला उद्या सहानिशा व चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले
नंतर मनमाड शहरातील काही राजकीय प्रतिष्ठित लोकांचे आम्हाला फोन देखील आले आहे (आमचे कडे झालेले बोलणे सर्व कॉल रेकॉर्डिंग आहे )
दि 24/05/2024 रोजी सकाळी रामेश्वर नामदेव हरण हा व्यक्ती चांदवड पोलीस ठाणेत येऊन आपल्याच दिलेल्या तक्रारीवरून पलटी मारली व खोटं बोलण्यास सुरवात केली की, मी तक्रार दारूच्या नशेत दिलेली आहे, असे कोणतेही लग्न झालेली नाही साखरपुडे झालेले आहे वगैरे वगैरे, 
त्या नुसार आम्ही आमच्या संघटने तर्फे सदर प्रकरणाची चौकशी केली व निर्णय घेतला की पोलीस विभाग योग्य ती चौकशी करून कारवाई करतील


म्हणून आम्ही दि 24/05/2024 रोजी संध्याकाळी पोलीस निरीक्षक साहेब चांदवड यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली की, पीडित मुलीचे मेडिकल करून पीडित मुलीचे जबाब घेण्यात यावे, आपल्या तर्फे या प्रकरणाची योग्य सखोल चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करावी, जर रामेश्वर नामदेव हरण हा व्यक्ती खोटं बोलत असेल तर त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी
चांदवड पोलीस विभागाने आपल्या तर्फे योग्य ती चौकशी केली असून त्यात वारंवार आपले स्टेटमेंट बदलून पोलीस विभागाची दिशाभूल करणारा रामेश्वर नामदेव हरण हा व्यक्ती दोषी आढळून आले, पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असू तपास सुरु आहे,
परंतु वारंवार पलटी मारणारा यांन जेव्हा चांदवड पोलिसात जाऊन आपले स्टेटमेंट बदली केले तेव्हा रामेश्वर नामदेव हरण ह्या व्यक्तीचे काही लोकांनी बाईट घेतले.
 कारण बातमी प्रसिद्ध करणारा व्यक्ती हा मानव अधिकार रक्षक मंच चा सभासद पदधिकारी होता, काही कारणाने त्याला संघटनेतून काढून टाकलेले आहे तसेच या व्यक्तीने मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्तेलोकांची सोशल मीडियावर बदनामी देखील केलेली होती त्या व्यक्तीवर मनमाड शहरातले सामाजिक कार्यकर्ते लोकांनी गुन्हे देखील दाखल केले आहे, याचाच राग मनात धरून कथाकथिट पत्रकार व्यक्ती हा बाल विवाह गुन्हेत आरोपी असलेल्या खोटे व्यक्तीचे खोटी बाईट घेऊन, आमचे बदनामी करण्याच्या हेतूने बातम्या प्रसिद्ध करतआहे,
त्यात काही एक तथ्य नाही,
म्हणून त्यास दुर्लक्ष करावे, 
ज्याला कोणाला या विषयाची सखोल माहिती पाहिजे असेल त्यांनी आमच्या संघटनेशी संपर्क करावे,
आमच्या कडे आलेली तक्रार व झालेले बाल विवाह लग्नाचे फोटो व्हिडीओ तसेच रामेश्वर नामदेव हरण यांनी आम्हाला वारंवार फोन करून दिलेली माहिती तसेच रामेश्वर नामदेव हरण यांनी मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीचे नाव घेऊन संगितले की त्या व्यक्तीचे लोक माझे हात पाय तोडणार आहे असे स्पष्ट सांगिलेले कॉल रेकॉर्डींग, तसेच 
आम्ही चांदवड पोलिसांना दिलेला योग्य कारवाई करण्याचे निवेदन,व मनमाड शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीने आम्हाला फोन करून केलेले संभाषण( कॉल रेकॉर्डिंग)
हे सर्व उपलब्ध आहे,
 या बदनामी करण्याच्या उद्देशाने लावलेल बातमी ही द्वेष पूर्ण, बदल्याच्या भावनाने लावलेल्या बातम्या आहे, त्या कडे दुर्लक्ष करावे,
नोंद :- पीडित मिहिलेची ओळख गोपनीय रहावी म्हणून अर्ज निवेदन ब्लर केले आहे,

मानव अधिकार रक्षक मंच हा सर्व सामान्य गोरगरीब लोकांच्या बाजूने नेहमी न्याय व हक्का साठी सातत्याने लढत आहे व लढत राहील, सत्यमेव जयते,

अशी बातमी  मानव अधिकार रक्षक मंच तर्फे देण्यात आली आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या