जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या आय.पी.एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडुन पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व खेळविणारे इसमांवर कारवाई करणेबाबत ओदशित करण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांनी पथकासह ओझर दहावा मैल परिसरात आय.पी.एल. मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर छापा टाकुन कारवाई केली आहे. दिनांक २४/०५/२०२४ रोजी आय.पी.एल. मालिकेत सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स् या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता, दरम्यान ओझर दहावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यावर बेटीग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर, दहावा मैल परिसरात हॉटेल फुडहब मधील रूममध्ये छापा टाकला. सदर ठिकाणी इसम नामे १) भव्य चैतन्य दवे, क्य २५, रा. दहिसर, मुंबई, २) जतीन नवीन सहा, क्य ४१, रा. धोबी अली, चरई, ठाणे पश्चिम, ता. जि. ठाणे यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाईन पध्दतीने त्यांचे इतर साथीदारांसह वरील आय.पी.एल. सामन्यावर त्यांचे कब्जातील मोबाईलव्दारे लोकांकडुन पैसे लावुन घेवुन बेकायदेशीररित्या सट्टा खेळतांना व खेळवितांना मिळून आले आहे. तसेच सदर इसमांनी वरील होटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी संगनमत करून त्यांचे बनावट नावाने आधारकार्ड बनवुन खरे नाव असल्याचे भासवून, बनावट सिमकार्डचा वापर करून आय.पी. एल. सामन्यांवर बेटींग लावण्यासाठी वेगवेगळया आय. डी. व्दारे इतर बुकींसोबत बेकायदेशीररित्या ऑनलाईन जुगार, सट्टा लावून शासनाची व मोबाईल कपंन्यांची फसवणुक केली म्हणून त्यांचेविरुध्द ओझर पोलीस ठाणे गुरनं १०७/२०२४ भादवि कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ सह महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४(अ) व ५, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर छाप्यात ताब्यात घेतलेले इसमांचे कब्जातून विविध कंपन्यांचे ०४ मोबाईल स्मार्टफोन व आय.पी.एल. बेटींगसाठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही, कॅल्क्युलेटर असा २२,१६०/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून मा. न्यायालयाने त्यांचे सात दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. यातील आरोपीतांकडे वरील गुन्हयाचे तपासात अधिक चौकशी केली असता, त्यांचे मुंबई येथील इतर साथीदार नामे ३) प्रथम राजेश सुचक, वय २३, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, ४) विनोद सुभाषचंद्र गुप्ता, वय ५०, रा. विकोळी पुर्व, मुंबई, ५) रमेश श्रीगोपाल जयस्वाल, वय ५४, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई, ६) विशाल किर्तीकुमार मडीयों, वय ४९, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई, ७) निखिल विरचंद विसरीया, वय ४६, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई यांना देखील वरील गुन्हयात अटक करण्यात आली असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे यांचे पथक करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजु सुर्वे, पोउनि दत्ता कांभीरे, पोउनि नाना शिरोळे, सपोउनि शिवाजी ठोंबरे, पोहता किशोर खराटे, मेघराज जाधव, उदय पाठक, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, गिरीष बागुल, नितीन डावखर, मनोज सानप यांचे पथकाने सदर कारवाई केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या