 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागातर्फे जिल्हयातील बँक अधिका-यांची महत्वाची बैठक दिनांक २७/०५/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाली. बैठकीस जिल्हयातील राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे २५ नोडल अधिकारी उपस्थित होते. मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांनी उपस्थीत बँक नोडल अधिकारी व
पोलीस अधिकारी यांना ऑनलाईन फसणुकी संदर्भातील येणा-या अडी-अडचणींबाबत चर्चा केली.
बैंक आणि एटीएमशी संबंधीत गुन्हयाबद्दल बँक अधिकारी आणि कर्मचा-यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे. गुन्हे प्रकरणांचा तपास सुरू असतांना बँक अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीसांशी समन्वय साधून तपासात सहकार्य करावे असे यावेळी सुचीत करण्यात आले. वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांबद्दल बँक खातेदारांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. सातत्याने घडणा-या बँक फॉड संबंधीत गुन्हयांची माहिती पोलीसांना देण्यात यावी. ऑनलाईन फसणूकीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी पोलीसांकडून सदर मोहीम राबविली जात असून यात बँकांची भुमीकाही महत्वाची आहे. एखाद्या व्यक्तीची ऑनलाईन फसवणुक झाल्यास संबंधीताने घटनेची वेळेत पोलीसांत तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. तक्रार दाखल होताच ज्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ते बँक खाते पोलीसांकडून गोठवले जाते. अशावेळी बँकांनीही तत्परता दाखवणे गरजेचे आहे.
ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे तपासात फसवणुक करणारे संशयीतांचे बँक अकाउंटची माहिती प्राप्त होण्यास उशिर होतो. तसेच स्थानिक बँकांकडे सर्व माहिती उपलब्ध नसते, जसे की, केवायसी, आय.पी. डिटेल्स इत्यादी उपयुक्त माहिती प्राप्त होण्यास विलंब होतो. तसेच एटीएम फ्रॉड/कार्ड क्लोनिंग केसेसमध्ये एटीएम विथड्रॉल संदर्भात एटीएम आयडी, सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळत नाही, संबंधीत बँक ही वेगळी असते त्यांचेशी संपर्क करण्यास अडचणी निर्माण होतात. ऑनलाईन व्यवहारांबाबत बँकेने खातेदारांना जागरूक करणे गरजेचे आहे, ओटीपी, सीव्हीव्ही, केडीट/डेबीट कार्ड नंबर्स, वैयक्तिक माहिती कोणतीही बँक ग्राहकांना फोनव्दारे विचारणा करत नाही तसेच बहुतांश फ्रॉड हे बँक हॉलिडेच्या दिवशी होतात, त्यासंदर्भात देखील ग्राहकांनी जागरूक रहावे यासाठी बँकेने ग्राहकांना प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रलोभन दाखविणा-या विविध इनव्हेस्टमेंट स्कीम, लोन अॅप, कोणतीही फ्रॉड लिंक यांची देखील माहिती ग्राहकांना देणे अपेक्षित आहे. सदर बैठकीदरम्यान वरील सर्व बाबींवर बँक नोडल अधिकारी व पोलीस प्रशासन यांचेत सुसंगतता रहावी यादृष्टीने चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाने ऑनलाईन फसवणुकी संदर्भात १९३० हेल्पलाईन व cybercrime.gov.in वेबसाईट सुरू केली असून फसवणुक झाल्यास बँक खातेदारांनी त्वरीत संपर्क साधुन आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या