Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महार वतन अमोन शर्तभंग प्रकरणी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला सुरुवात.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


मौजे कोल्हार बु, ता. राहाता, अहमदनगर येथील गाव नोकर इनाम वर्ग 6 व जमिनीचे गट क्र. 482, 483, 484, 485, 486, 487, 495, 496, 507, 508, 515 अशा तब्बल 11 गांच्या 21 एकर जमिनीचा भूखंड दिवंगत केंद्रीय कृषि मंत्री आण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांनी विविध खरेदी दस्ताने व भाडेपट्ट्याने स्वतःच्या नावे करुन घेताने शर्तभंग केला होता. याच जमिनीचे दिवंगत शिंदे यांच्या कुटुंबीयांनी दिनांक : 27/10/2023 रोजी दुय्यम निबंधक राहाता यांच्या समोर गाव नोकर इनाम वर्ग 6 ब चो वतन जमीन असल्याची माहिती लपवून बिल्डर अजित झुंबरलाल कुंकूलोळच्या कुटुंबियांना बेकायदा खरेदी दस्त क्र. 6122 ते 6127 नुसार विक्री केली आहे. सदरच्या खरेदी दस्तामुळे शर्तभंग झालेला आहे.


शिदे कुटुंबीयांनी अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर व शिर्डी, अपर आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, तहसीलदार राहाता यांचेशी मोठी आर्थिक देवाण-घेवाण करुन सदरच्या जमिनीच्या संबंधात नजराणा भरणेकामी बेकायदा आदेश पारित करुन घेतले आहेत. त्यामुळे शर्तभंग झालेला असून तत्काळ उचित कारवाई न केल्यास वतनी मालमत्तेची विल्हेवाट लागणार आहे. संबंधित महसूल अधिकारी यांनी पारित केलेले आदेश वतन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहेत. त्यामुळे सदरचे बेकायदा आदेश तत्काळ मागे घेण्यात यावे.
जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय इनाम वर्ग 6 ब च्या मालमत्ता त्याच वतनाचा वतनदार नसलेल्या कुंकूलोळ याच्या कुटुंबियांच्या फायदेशीर कब्जात गेल्याने शर्तभंग झालेला आहे.

तसेच सदरहू मिळकतींची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी बिल्डर अजित कुंकूलोळ याने सदरच्या मिळकतीमध्ये बेकायदा इमारत बांधकाम सुरु केले आहे, याबाबत उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांचे समोर तक्रार केस दाखल करुन देखील केवळ आम्ही विशिष्ट जातीचे असल्याने त्यांनो कोणतीही कारवाई केलेली नाही. महसूल अधिकारी यांच्या बेकायदेशीर कारभारामुळे आमचे आर्थिक, सामाजिक व मानसिक शोषण होत आहे. केवळ आम्ही पूर्वाश्रमीचे महार व आजचे बौद्ध आहोत म्हणून आम्हाला नैसर्गिक न्यायाची संधी देखील दिली जात नाही असे निवेदनात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या