![]() |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003 |
येवला येथील हुडको परिसरातील सुलभानगर कॉलनीतील गटारी मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या असून परिणामी डासांचे प्रमाण वाढले असून तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.तसेच मोठ्या प्रमाणात सदर गटारीमध्ये ब्लोकेज निर्माण होऊन गटारी तुंबलेल्या आहे.येवला नगर परिषद येवला येथील स्वच्छता विभागाचे कर्मचारी देखील रोजच्या रोज गटारी काढण्यासाठी येत नाही.याबाबत सुलाभानगर कॉलनीतील नागरिकांनी वेळोवेळी मुख्याधिकारी येवला नगर परिषद येवला यांचेकडे लेखी/ तोंडी तक्रारी देखील केल्या.परंतु येवला नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने याबाबत कुठलीच दखल घेतली नाही.म्हणून व्यथित होऊन तेथील नागरिकांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष श्री.जितेंद्र भावे सर यांचेकडे दाद मागितली.त्यांचे सूचनेनुसार निर्भय महाराष्ट्र पार्टी चे वतीने मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला यांना सदर गटारिंमधील ब्लॉकेज काढून तुंबलेल्या गटारी तत्काळ स्वच्छ करण्यात याव्यात.
अन्यथा आठ दिवसानंतर नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येईल.असा ईशारा दि.01/03/2024 वार.शुक्रवार रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टी चे वतीने देण्यात आला.यावेळी निवेदन देताना निर्भय महाराष्ट्र पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष श्री.सागर साळी, येवला विधानसभा सचिव श्री.विलास पैठणकर,तसेच येवला येथील हुडको मधील सुलभानगर कॉलनीतील श्री.मनोज सूर्यवंशी उपस्थित होते.


0 टिप्पण्या