 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मनमाड नगर परिषद तर्फे 19 लाख रुपये प्रती महिना पाणी फिल्टर खर्च करून देखील शहराला मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा.?
मनमाड :- मनमाड नगर परिषद तर्फे मनमाड शहरात 20 ते 22 दिवस आड पाणी पुरवठा केला जातो, पाणी वितरण करतांना, पाणी फिल्टर साठी TCL पावडर,तुरटी एलन, लिकव्हीट क्लोरिंन गैस,असे
चार लाख रुपये तर पाणी फिल्टर चे विद्दूत बिल पंधरा लाख रुपये, असे प्रत्येक महिन्याला एकूण 19 लाख रुपये खर्च केल जातो, तरी देखील शहराला मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे,
मनमाड नगर परिषद तर्फे पाणी वितरण करतांना दि 04/03/ 2024 रोजी पिण्यास अयोग्य असलेले गढूळ पाणी वितरण करण्यात आलेले आहे,
असे पाणी लोक जनावरांना देखील पाजणार नाही असे पिण्याचे पाणी नाईलाजाने शहरातील नागरिकांना प्यावे लागत आहे, असे फेस युक्त दूषित सारखे गढूळ पाणी पिण्यामुळे नागरिकांना,किडनी स्टोन, लिव्हर प्रॉब्लम, पोटाचे आजार असे आरोग्याची समस्या उद्भवणार आहे, तर शहराला मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित गढूळ पाण्याचा पुरवठा होतो.
विविध भागात अशुद्ध व गढूळ पाणी पुरवठा असताना पालिकेतील कर्मचारी अधिकारी व पदाधिकारी मात्र शुद्ध पाण्याच्या जारमधील शुध्द पाण्याच्या जारमधील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शहरात अशुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याने अनेक नागरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाण्याच्या जारचा वापर करीत आहे. प्रश्न पडला आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या नागरिकासाठी ही बाब नाहकचा भुर्दंड देणारी ठरली आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाने याची वेळेच दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा असे संतत्प प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे,
0 टिप्पण्या