जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003


मनमाड - मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा नागरिक भागात असलेल्या धार्मिकस्थळ, मंदिरांमध्ये वळविला असून मनमाड शहरातील स्वामी विवेकानंद नगर-2 मनमाड येथील भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदीर चोरी झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनमाड येथील श्री भोलेश्वर जय भोलेनाथ महादेव मंदीर मंदिरात आलेल्या दोन चोरट्यांनी येऊन मंदिरातील दानपेटी अंदाजे रक्कम 10 ते 15 हजार रू चोरट्याने चोरी केलेली आहे.त्याचबरोबर याच मंदिराच्या थोड्या अंतरावर असलेल्या गणेश नगर महाकाल मंदिर येथे ऍम्प्लिफायर दोन स्पीकर मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी चोरी केली असून


या दोन्ही मंदिरातील चोरट्यांनी चोरी केली आहेत. दरम्यान मनमाड शहर भागातील मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस यंत्रणेने या वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी व रात्रीचे ग्रस्त वाढवावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे,