Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र सांगळे व सचिव पदी महेश अहिरे यांची मनमाड आगारांच्या कामगारांच्या मते बिनविरोध निवड.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


मनमाड : आगारात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची निवडणूक पार पडली. मात्र सदरची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय चर्चेतून समोर आल्यानंतर सदरची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदी रवींद्र सांगळे व सचिवपदी महेश अहिरे यांची बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंनदोत्सव साजरा करण्यात आला.

एसटी महामंडळातील एकमेव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या नावाने सक्रिय असून, आज या युनियनची मनमाड आगारांतील कामगारांच्या सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. यावेळी रवींद्र सांगळे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी
महेश अहिरे यांची नावे समोर येऊन बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय पवार व जिल्हा सचिव स्वप्निल गडकरी यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी अरुण सांगळे, बबन मार्कंड, सचिन वाघ, रवी आरोटे, विजय आव्हाड, पिंटू आव्हाड, भगवान कुणगर, संजय सांगळे, शिवाजी खैरनार, गणेश काकड, हरिभाऊ हलवर, शरद गांगुर्डे, बी. के. शहा, एच. डी. बर्डे, डी. एल. नाईकवाडी, पी. बी. आहेर, आय. सी. गवळी, चव्हाण, पी. बी. देवरे, पंढरीनाथ जाधव आदी एसटी संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या