Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरातील पाच वर्षाच्या उसेद आत्तार ने या कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या जीवनातील पहिला रोजा(उपवास) पूर्ण केला,

 

मनमाड शहरातील पाच वर्षाच्या उसेद आत्तार ने या कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या जीवनातील पहिला रोजा(उपवास) पूर्ण केला,

मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर रोजा (उपवास) फर्ज (बंधनकार) असतात. लहान पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत या रमजान महिन्यांमध्ये रोजा धरतात.
पालकांचे रोजा (उपवास) करतांना पाहून घरातील लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात व पूर्ण करतात,

अशाच प्रकारे मनमाड शहरातील अत्तार संघटने चे शहराध्यक्ष सद्दाम अत्तार यांचे 5 वर्षा चे चिरंजीव उसेद अत्तार या चिमुकले बाळाने कडाक्याच्या उन्हाळ्यात आपल्या जीवनातील पहिला रोजा दिनांक १७ मार्च रविवार वार रोजी पूर्ण केला आहे, मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर अन्न व पाणी न घेता हे रोजा (उपवास) ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या साडे पाच वर्ष्याची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून ईस्लाम धर्मानुसार आपल्या आयुष्यातील चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे,रोजा (उपवास) केल्याबद्दल या5 वर्षा चे चिमुकले बाळ उसेद अत्तार चा सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या