Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सन्मान कार्यकर्तृत्वाचा - पोलीस अवॉर्ड 2024उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या ४० पोलीसांचा मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले


सन्मान कार्यकर्तृत्वाचा - पोलीस अवॉर्ड 2024उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या ४० पोलीसांचा मुंबई उच्च न्यायालयाचे  अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते गौरविण्यात आले 

लोकशाहीचा चौथा स्तंभ वर्तमानपत्र हा पोलिसाच्या कामावर सतत लक्ष ठेवून असतो पोलिसाने केलेल्या चांगल्या कामाच्या बातम्या प्रसारित करणे तसेच केलेल्या चुकीचा देखील उघड करणे हे वर्तमानपत्राचे काम असते मागील वर्षभरात आम्ही पोलीस स्टेशन येथे केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव भारतातील व जगातील नामांकित असलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या दिव्य मराठी तर्फे छत्रपती संभाजी नगर शहर छत्रपती संभाजी नगर ग्रामीण, छत्रपती संभाजी नगर लोहमार्ग व छत्रपती संभाजी नगर एक्साईज डिपार्टमेंट या खात्यातील चांगले काम केलेल्या अधिकाऱ्यांचा व अमलदारांचा छत्रपती संभाजी नगर येथील नामांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे काल गुणगौरव करून मा. उज्वल निकम यांच्या हस्ते मा. मनोज लोहिया सर पोलीस आयुक्त छत्रपती संभाजी नगर, मा. मोक्षदा पाटील मॅडम पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर यांच्या व ईतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात वर्तमान पत्राकडून मिळालेला हा पुरस्कार पुढील कामासाठी ऊर्जादायी ठरेल तसेच मनमाड रेल्वे पोलीस ठाण्याच्या सर्व अंमलदारांनी केलेल्या कामाचा हा गुणगौरव असून त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या