Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वाहतूक सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांतर्फे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य विविध स्पर्धेचे आयोजन,

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

वाहतूक सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांतर्फे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य विविध स्पर्धेचे आयोजन,

मुंबई:- आज दिनांक 30/01/2024 रोजी  मुंबई पोलिसांतर्फे वाहतूक सुरक्षा महिन्याच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य विविध स्पर्धेचे आयोजन राजश्री  हॉल मराठा कॉलनी रोड दहिसर, पूर्व, मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते.


 स्पर्धेत 1) विद्यामंदिर हायस्कूल मराठी माध्यम 2) स्वामी विवेकानंद हायस्कूल मराठी माध्यम 3) तांबे एज्युकेशन मराठी माध्यम, 4) विद्याभूषण हायस्कूल मराठी माध्यम,5)  विद्यामंदिर हायस्कूल इंग्रजी माध्यम, 6) पूर्ण प्रज्ञा हायस्कूल इंग्रजी माध्यम,7) संजीवनी हायस्कूल इंग्रजी माध्यम,8) स्वामी विवेकानंद हायस्कूल इंग्रजी माध्यम,9) मातृछाया हायस्कूल इंग्रजी माध्यम,10) सेंट झेवियर हायस्कूल इंग्रजी माध्यम
आशे दहा शाळांनी सहभाग नोंदविला होता सर्व परीक्षा एकाच वेळी वेगवेगळ्या हॉलमध्ये ११.०० वा. ते १२.०० वा. चे दरम्यान घेण्यात आलेल्या होत्या. या वेळी शाळेतील ३०० विद्यार्थी व शिक्षक- पालक उपस्थित होते


स्पर्धा परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी व शिक्षक यांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले.
विजय सोनार प्रभारी पोलीस निरीक्षक दहिसर वाहतूक विभाग यांचे तर्फे शिक्षक व पालक यांचे स्वागत करण्यात आले तर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा  भरवल्या बद्दल शिक्षक व पालकांतर्फे मुंबई पोलीस दहिसर वाहतूक विभाग मुंबई पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले, या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या