 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
मनमाड महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी मनमाड शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य या महाविद्यालयाने पार पाडले आहे तसेच माजी विद्यार्थी व विद्यमान विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात त्यांचा आदर्श आजी विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल केले पाहिजे. असे सांगून पुढे त्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकाला कोणत्याही प्रकारची जात, धर्म असत नाही तर विद्यार्थी हीच त्याची खरी ओळख असते व शिक्षकात संपूर्ण पिढी बदलविण्याची ताकद देखील असते असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मेळाव्याचे संयोजक आणि हिंदी विभाग विभाग प्रमुख प्रो.डॉ. जे. वाय इंगळे यांनी केले . त्यांनी आपल्या मनोगतातून मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की,महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असतो.आमचे महाविद्यालयाने मनमाड शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गरीब - शेतकरी - शेतमजूर आणि कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य केले आहे. आज या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, शिक्षण , राजकीय ,कला,क्रीडा, सांस्कृतिक, उद्योजकता अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे,असे मत प्रो.डॉ. इंगळे यांनी व्यक्त केले. पुढे देखील महाविद्यालयाला योगदान देण्याचे आवाहन त्यांनी माजी विद्यार्थ्यांना केले. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनोगतातून महाविद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त केली व शिक्षण घेत असताना त्यांना आलेले अनुभव सांगताना त्यांच्या यशस्वी वाटचालीत महाविद्यालयाचे असणारे योगदान स्पष्ट केले.
या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र देशमुख ,चंद्रकांत गोगड, नगरसेवक महेंद्र शिरसाट, नामको बैंकेचे संचालक सुभाष नहार, सुनील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, रब्बानी सर, उद्योजक विकास काकडे, कवी राजू लहिरे,राजु गायकवाड , डॉ.संतोष पगार, पंकज खताळ,श्रीमती भाग्यश्री दराडे, समाजसेवक विठ्ठल नलावडे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, डॉ.सागर कोल्हे, प्राचार्य भराडे, प्रशांत सोनवणे सर , भीमराव जेजूरे यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.मेळावा यशस्वीतेसाठी सर्व समिती सदस्यांसह राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख , कुलसचिव, प्राध्यापक, सर्व प्रशासकीय पदाधिकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश गांगुर्डे यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले यांनी मानले.
0 टिप्पण्या