 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003 |
महाराष्ट्रात शुरवीर संभाजी करवर यांची जयंती उत्साहात साजरी.
नांदगाव.दि. १४ जानेवारी ला तालुक्यातील हिसवळ बु: येथे कानडे / कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांचे १० विश्वासू अंगरक्षकांपैकी एक शुरवीर संभाजी करवर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी कानडे , कानडी समाजसेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बोगीर होते. सूत्रसंचालन पंढरीनाथ करवर (सर) यांनी केले. तर हिसवळ बु: ग्रामपंचायतचे उपसरपंच आण्णा बिन्नर यांनी अनुमोदन दिले. प्रसंगी करवर सर तसेच सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक बोगीर साहेब यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण बोगीर यांनी शूर वीर संभाजी करवर यांचा इतिहास सांगितला.
बाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी हिंदवी स्वराज्याच्या लढाईत सामील झालेला मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या १० विश्वासू अंगरक्षकांपैकी एक शूरवीर संभाजी करवर यांचा जन्म योग १४ जानेवारी १६३६ तशी नोंद औंढ संस्थान प्रांत प्रतिनिधी विजापूर येथील अदिलशाही दप्तरी तसेच निजामशाहीचे हैदराबाद दप्तरी आढळून आली. त्याप्रमाणे महाराष्ट्रात हटकर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भीमराव भुसनर व कानडे , कानडी समाज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण निवृत्ती बोगीर यांच्या प्रेरणेने सर्व समाज बांधव गावोगावी शूर वीर संभाजी करवर यांची जयंती आयोजन करुन उत्साहात साजरी करत आहेत. त्यातूनच पुढील भावी पिढीला प्रेरणा मिळून तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहात सामील होत आहे.
याप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते भास्कर करवर, शांताराम करवर, मनोहर बिंन्नर, माजी सरपंच बाळासाहेब बेंडके, गंगाधर जोरवर, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र करवर, जिल्हा परिषद सदस्य फकीरा जगताप, लोकनियुक्त सरपंच शांताराम पवार, निलेश देशमुख योगेश (जवान) देशमुख, कैलास बोगीर, संतोष बोगीर, माजी चेअरमन समाधान बोगीर, संजय करवर, श्रावण करवर, रवींद्र करवर, दत्तू करवर, बापूराव जोरवर, शिवाजी जोरवर, योगेश जोरवर, आबा जोरवर, रवींद्र जोरवर, पुंजाराम बेंडके, संभाजी बेंडके, धनराज बेंडके, गणेश बेंडके, आदी असंख्य समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी तिळगुळ वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या