Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राहुल बी.पाटील.(संगणक विभाग)येवला नगरपरिषद यांचा घरभाडे भत्ता त्वरित बंद करून गुन्हा दाखल करण्यात यावे.निर्भय महाराष्ट्र पार्टीची मागणी.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

 राहुल बी.पाटील.(संगणक विभाग)येवला नगरपरिषद यांचा घरभाडे भत्ता त्वरित बंद करून गुन्हा दाखल करण्यात यावे.निर्भय महाराष्ट्र पार्टीची मागणी.

येवला.राहुल बी.पाटील हे येवला नगरपरिषद कार्यालयात संगणक विभागात कार्यरत आहे. सदर कर्मचारी कार्यालयीन दिवशी नाशिक - येवला अपडाउन करत असतात.वास्तविक शासन निर्णयाप्रमाणे या कर्मचाऱ्याने मुख्यालयी राहणे अपेक्षित असूनही हा कर्मचारी मुख्यालयी राहत नाही.यांनी शासनाची फसवणूक करून आत्तापर्यंत घरभाडे भत्ता मिळवलेला आहे.करिता श्री.राहुल बी.पाटील.यांची तातडीने चौकशी होऊन यांनी आत्तापर्यंत घरभाडे भत्ता मिळवण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची संपूर्ण छायांकित प्रती त्वरित आम्हास मिळाव्यात.तसेच दुय्यम निबंधक साहेब यांचेसमोर अधिकृतपणे केलेल्या घरभाडे करार नामाची प्रत व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती त्वरित मिळाव्यात.आमची खात्री आहे की,श्री.राहुल पाटील हे मुख्यालयी न राहता यांनी शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता घेतलेला आहे.करिता त्यांचा घरभाडे भत्ता त्वरित बंद करून आत्तापर्यंत घेतलेला घरभाडे भत्ता वसूल करावा. व त्यांचेवर चौकशीअंती गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार दि.24/1/2024 रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टी चे येवला विधानसभा अध्यक्ष श्री.सागर साळी,तसेच येवला विधानसभा सचिव श्री.विलास पैठणकर,सदस्य श्री.अक्षय पैठणकर यांनी मुख्याधिकारी साहेब,येवला नगरपरिषद येवला,यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या