Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राहुरी येथील वकील दाम्पत्याचे हत्येचे निषेधार्थ मनमाड वकील संघातर्फे न्यायालयीन कामकाज बंद.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

 राहुरी येथील वकील दाम्पत्याचे हत्येचे निषेधार्थ मनमाड वकील संघातर्फे न्यायालयीन कामकाज बंद.

मनमाड.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका वकील संघाचे सदस्य अॅड. राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करुन निर्घणपणे हत्या करुन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकण्यात आले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दि. २९/०१/२०२४ रोजी मनमाड वकील संघाची तातडीची बैठक घेऊन मनमाड न्यायालयाचे एक दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर केला. तसेच सदर बैठकीत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर सोनवणे यांनी सदर हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना सांगितले की, वकील हा न्याय व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे. तरी देखील गेल्या काही वर्षात वकीलांवर हल्ला करणे, हत्या करणे, शिवीगाळ व धमक्या देणे, खोट्या तक्रारी करणे, अशा घटना वारंवार घडत आहे. त्यामुळे अशा घटनापासुन वकीलांना संरक्षण मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायदा तातडीने पारीत केला पाहीजे. माजी अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे, सचिव अॅड. शशिकांत व्यवहारे, अॅड. मनोज मुलचंदानी, अॅड. उल्हास गवांदे, अॅड. हेमंत सोनवणे यांनी देखील सदर दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि मयत आढाव दाम्पत्यास

भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर मनमाड वकील संघाचे सर्व सदस्यांनी मा. तहसिलदार साहेब, नांदगाव यांचे प्रतिनिधी मा. मंडल अधिकारी, मनमाड यांचे कार्यालयात जाऊन महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायदा तातडीने पारीत करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले 

सदर बैठकीत अॅड. किशोर सोनवणे, अॅड. सुरेश पाटील, अॅड. शशिकांत व्यवहारे, अॅड. सुधाकर मोरे, अॅड.एम.जी.बापट, अॅड. सुमित दंडगव्हाळ, अॅड. दिलीप देसले, अॅड.एस.एस. लांबोळे, अॅड. हेमंत सोनवणे, अॅड. उल्हास गवांदे, अॅड. मोहन माळवतकर, अॅड. अनिल कुंझरकर, अॅड. शेखर महाजन, अॅड. आनंदराज पाटील, अॅड. सतीष दुबे, अॅड. वाल्मिक जगताप, अॅड. निलेश केदारे, अॅड. मनोज मुलचंदानी, अॅड. राजेंद्र पालवे, अॅड. सुरेश मल्हारे, अॅड. प्रदीप संसारे, अॅड. अमित सोनवणे, अॅड. सुनिल भागवत, अॅड. मुन्नवर पठाण, अॅड. स्वप्निल व्यवहारे, अॅड. के. पी. कुभांरे, अॅड. योगेश मिसर, अॅड. अमोल लहाने, अॅड. संजय गांधी, अॅड. लाजवंती गायकवाड, अँड. कविता आव्हाड, अॅड. यास्मिन शहा, अॅड. पुजा मल्हारे, इ. सर्व वकील उपस्तित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या