मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई पुकारलेल्या आंदोलनास, नांदगाव तालुक्यातील मराठा बांधव,मुंबई जात असतांना मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटना तर्फे, मराठा बांधवांचे स्वागत करून सत्कार करण्यात आले,
मनमाड :- मराठा समाज आरक्षणासाठी अंतरवली सराटीतुन संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची मशाल पेटवणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनास मराठा आरक्षण संदर्भात अंतिम मुद्दत दिली होती, अंतिम मुद्दत नंतर मनोज जरांगे पाटील तर्फे, मुंबई येथे आंदोलन पुकारण्यात आले असून, संपूर्ण महाराष्ट्रतुन मराठा बांधव हे मुंबई च्या दिशेने निघाले आहे,
नांदगाव तालुक्यातील मराठा बांधवांचा मुंबई आंदोलनास सक्रिय सहभाग होतांना दिसत आहे,
हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करत, मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे, त्या अनुषंगाने, मराठा बांधवांच मनमाड शहरात आगमन,
मनमाड शहरात आगमन होताच, मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटना तर्फे पाकिजा कॉर्नर येथे मराठा बांधवांचे स्वागत करण्यात आले, या वेळी,फुले शाहू आंबेडकर चे अहमद बेग (बेग चाचा ) फिरोज शेख, मनमाड बचाव जन आंदोलनाचे, मुस्लिम आरक्षण समिती चे कादीर शेख, यांनी आपले मनोगत व्यक्त करून,
अखील भारतीय मराठा महासंघाचे, भीमराज लोखंडे, भास्कर झल्टे, विष्णू चव्हाण, विशाल बडघुले, मराठा महासंघ व सकल मराठा समाज बांधवांचे पुष्प गुच्छ देऊन, सत्कार करण्यात आले, या वेळी,अत्तार संघटनाचे शहराध्यक्ष सद्दाम अत्तार,शकील शेख, हाजी शफी मुसा, रफिक बाबूजी, शकूर शेख, इस्माईल पठाण, अल्तामश शेख, इरफान भाई, हाजी नईम शेख, आसिफ तांबोळी (दादा ) मुस्तकीम भाई, अमजद पठाण, व मनमाड शहरातील इतर समाजबांधव उपस्तित होते,



0 टिप्पण्या