Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

२२ जानेवारीला "श्रीराम ज्योती" प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा. भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री शंकर राव वाघ.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

२२ जानेवारीला "श्रीराम ज्योती" प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा. भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री शंकर राव वाघ.

 नाशिक.अयोध्या राम लला च्या प्रतिष्ठापनेची तुमच्या ,माझ्या सह जगाला उत्सुकता आहे रामलला च्या प्रतिष्ठा पना दिनी अर्थात दि. २२ जानेवारी रोजी ' श्री राम ज्योती ' नावाने एक विशेष दिवा प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्याचे आवाहन भाजपा नाशिकजिल्हा अध्यक्ष श्री शंकर राव वाघ यांनी जिल्हा वासियांना केले आहे

    राम मंदिर व्हावे ही तमाम राम भक्तांची इच्छा होती.तशीच अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही तुमची माझी देखील इच्छा होती. काही लोक म्हणायचे मंदिर वही बनायेंगे , तारीख नही बतायेंगे , पण मोदीजींनी मंदिर देखील बनवले , तारीख देखील सांगितली आणि उदघाटन देखील होणार आहे. जिल्हया तील तमाम राम भक्त दिनांक. २२ जानेवारी ची वाट बघत आहेत. नाशिक जिल्ह्यात घराघरात अक्षता पोहोचल्या आहेत. तमाम राम भक्तांना आयोधेतल्या प्रभू राम चंद्राचे दर्शन घेण्याचे आमंत्रण दिले आहे. दिनांक २२ जानेवारीला राम मंदिराचे उदघाटन झाल्यावर सगळ्या राम भक्तांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. त्या वेळी सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घ्यावे, असे आव्हान श्री शंकर राव वाघ यांनी केले. आज केवळ जिल्ह्यात , महाराष्ट्रात नाही तर देशात आणि जगात राम मदिराबाबंत उतुस्कता आहे. आणि आकर्षण आहे. कोट्यवधी राम भक्त त्या ठिकाणी गेल्यावर त्यांची गैर सोय होऊ नये म्हणून अयोध्या नगरी सजली आहे. भाजपा साठी अयोध्या हा विषय अस्मिता आणि श्रध्देचा आहे, तर राम मंदिर हे देशाचा अभिमान असल्याचे श्री शंकर राव वाघ यांनी नमूद केले.

    या निमत्ताने जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंदिरात धार्मिक कार्य क्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात रामभक्तांसह तमाम जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हि त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या