 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार .8888509003. |
महाराष्ट्र राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या 85 संवर्गातील शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास भारतीय जनसंसद विरोध करणार.
संपूर्ण देश राममंदिर उदघाट्न समारोह मध्ये मग्न असताना हळूच कोणालाही कळणार नाही अश्या पद्धतीने गुपचूपपणे राज्य सरकारने आरक्षणावर जोरदार हातोडा मारून आरक्षणच समाप्त केले आहे ...
वेगवेगळ्या 85 संवर्गातील शासकीय पदे आता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे .9 खाजगी कंपन्यांना भरतीचे कंत्राट देणार आहे . या सर्व कंपन्या सत्तेतील आमदार मंत्री यांच्या असून या कंपन्यांना शासनाकडून कमिशन मिळणार आहे .
महाराष्ट्र राज्य विधिमंडळात एक बील पास करण्यात आले आहे . यापुढे SC/ST/OBC/NT/VJNT या मागासवर्गीय समाजातील मुलांना चतुर्थ श्रेणी, तृतीय श्रेणी, आणि द्वितीय श्रेणी कर्मचारी भरती तसेच खाजगी (PRIVATE UNIVARSITY) विद्यापीठे मध्ये कोणतेही आरक्षण मिळणार नाही . याशिवाय Scholarship आणि Freeship ही सुद्धा मिळणार नाही . ही माहिती कोणत्याही मीडियावर येऊ नये याची दक्षता महाराष्ट्र राज्य सरकार घेत आहे .
सदरच्या निर्णया.सविस्तर माहिती घेऊन याला भारतीय जनसंसद राज्यभर विरोध करणार आहे .अशी माहिती भारतीय जनसंसदेचे राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांनी दिली
0 टिप्पण्या