Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

विविधतेने रंगला लायन्सचा पतंग उत्सव 2024.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003

विविधतेने रंगला लायन्सचा पतंग उत्सव 2024.

मनमाड-येथील लाईन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजित व पंकज खताळ पाटील फाउंडेशन प्रायोजित पतंग उत्सव 2024 मनमाड येथील श्री महर्षी वाल्मिकी स्टेडियम येथे उत्साहाने साजरा झाला. मकर संक्रांतीचे औचित्य साधून रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 ते 6 येथे हा पतंग उत्सव रंगला, यात लहान थोर मुले मुली श्री पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी उत्साहाने कुटुंबासहित सहभाग नोंदवला, पतंग महोत्सव स्पर्धा 2024 यात जवळपास दीडशे स्पर्धकांनी नावे नोंदणी केली.

याच विविध प्रकारात बक्षीस देण्यात आली 1, सर्वात मोठा भव्यपतंग ऋतुजा परदेशी व भगिनी 2. सर्वात सुशोभित पतंग-शाखाद्वीपी 3. सर्वात उंच उडणारा पतंग दीपक मंगवाने व कुटुंब .4. सर्वात लहान बालकाचा पतंग यशस्वी गणेश हडपे 5. पतंग उसात सर्वात लहान मुलीचा पतंग तनवी महेश माळी 6. पतंग सहभाग घेणारे सर्वात मोठे कुटुंब--संदीप सांगळे व कुटुंबीय असे विविध गटात बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रायोजक श्री पंकज खताळ पाटील.लाइन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे अध्यक्ष सौ सुचिता खताळ,, पतंग 2024 चे प्रोजेक्ट चेअर पर्सन लायन डॉक्टर निलेश राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, नायलॉन म्हणजे चा वापर न करता अपघात मुक्त मकर संक्रांति पतंग उत्सव साजरा करावा हे उदाहरण क्लबने यानिमित्त नागरिकांपुढे ठेवले आहे वैविध्यपूर्ण पतंगांनी स्टेडियमचे आवर भरून गेले होते, रंगबिरंगी पतंग तिरंगी पतंग विविध संदेश देणारे पतंग विविध आकारांचे पतंग ,,फुलपाखरू आकाराचा पतंग शुभ्रा गुजराती या मुलीने बनवून आणला होता तिला रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले,

चली चली रे मेरी पतंग चली, धिल दे दे रे धील दे दे रे भैया, अशा विविध पतंगोत्सवाच्या गाण्याचे संगीतावर सर्व सहभागी थीरकत होते. उपस्थित सर्वांना तिळगुळ वाटून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी क्लबचे सचिव ला गणेश हडपे. खजिनदार सौ मनीषा अग्रवाल. रेखा येणारे, वैशाली वाणी, सुनिता डगळे, डॉ. अर्चना राठी, संगीता कदम, पुष्पाताई मतकर, तसेच ला शशिकांत व्यवहारे, ला सिद्धार्थ जोगदंड, ला चंद्रकांत मेगाणे, ला भारत जगताप, ला तपण रॉय, ला सप्तेश गुप्ता. लायन पी बी कुलकर्णी सर, एम जे एफ ला डॉ प्रताप गुजराथी, एम जे एफ ला. प्रा. डॉ. जे वाय इंगळे सर, प्राइड चे अध्यक्ष विवेक बरडीया, डॉ. दिलीप मुथा डॉ. अनिल सोनार इत्यादी सन्माननीय उपस्थित होते, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, दरवर्षी अशा पतंग महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंकज खताळ कुटुंबीय व लायन्स मनमाड सिटी तर्फे करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या