 |
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003
|
मनमाड मराठा साखळी उपोषणाला मनमाड किराणा असोसिएशनचा पाठिंबा देण्यात आला.
मनमाड.राज्य सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी देऊनही निर्णय झाला नाही त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण बेमुदत उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आजचा 6 वा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून राज्य सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा.
याबाबत मनमाड शहर सकल मराठा समाजातर्फे मनमाड शहरात आरक्षणा संदर्भात साखळी उपोषणास बसलेल्या मराठा बांधवांना व कार्यकर्त्यांना मनमाड किराणा असोसिएशन तर्फे जाहिर पाठींबा देण्यात आले यावेळी. मराठा आरक्षण ला समर्थन देणारे पत्रक देतांना अध्यक्ष दिपक मुनोत, जेष्ठ सदस्य कैलासकाका टेमगिरे, राकेश ललवाणी, अनुप बेदमुथा, सुधीर बेदमुथा डॉ. धीरज बरडिया, किरण देव, अभयसेठ हिरण, कल्पेश नहार, हितेश लुनावत आदी व्यापारी उपस्थित होते
0 टिप्पण्या