Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक ग्रामीण पोलिसांचे उद्यापासून गुटखा विरोधी अभियान ४.०

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

नाशिक ग्रामीण पोलिसांचे उद्यापासून गुटखा विरोधी अभियान ४.०

मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधी अभियान छेडले असून जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी स्थापित केलेल्या ८ विशेष पथकांसह जिल्ह्यातील सर्व ४० पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यात हिरीरीने भाग घेत आहेत.
याशिवाय जिल्ह्यातील अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून चार महिला पथकांची देखील निर्मिती करण्यात आली असून, सदर कर्तव्यार्थ नेमण्यात आलेले महिला अंमलदार जिल्ह्यातील दरी डोंगरात फिरून अवैध दारू उत्पादनाची ठिकाणे उध्वस्त करत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मटका, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, अन्न भेसळ यासह सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायावर कारवाया करण्यात येत आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा हद्दपार करण्यासाठी यापूर्वी तीन अभियान राबवले असून दिनांक ०६/१०/२०२३ रोजीपासून गुटखा विरोधी अभियान ४.० सुरू करण्यात येत आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून सदरचे अभियान राबविण्यात येत आहे. गुटख्यासोबतच इतर सर्वच प्रकारच्या व्यवसायाविरुद्ध
नाशिक ग्रामीण पोलिसांचे अभियान सुरू राहणार आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध व्यवसायांची इत्यंभूत माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवून नाशिक ग्रामीण पोलिसांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हदपार होण्यासाठी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी खबर ही हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी ६२६२२५ ६३६३ या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या