नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील साकोरा या गावात जातीयवादी गावगुंडाकडून बौध्द तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे
येथील अमोल दौलत निकम हा मोल मजुरी करणाऱ्या तरुणास तू माझे दुकान सोडून दुसऱ्याकडे का कामाला गेलास? साल्या महारड्या शेवटी तू जातीवरच गेलास असे म्हणत श्री अशोक बाळासाहेब बोरसे या जातियवादी गावगुंडांनी मारहाण केली , त्यावेळी त्याचा मुलगा अनिकेत अशोक बोरसे याने लोखंडी गज आणून दिला तेव्हा त्या गजाने अमोल निकम या बौध्द तरुणाच्या डोक्यात वार करून तो मेला असे समजून काही मदतीला धावलेल्या लोकांना एक महार मारलाय तुम्हालाही मरायच आहे का तुम्हाला दाखवतो पाटलाचा हिसका असे म्हणून निघून गेला . त्यावेळी काही बौध्द तरुणांनी त्याच्या नातेवाईकांना फोन केला तेव्हा ते मळ्यातून आल्यावर त्यांनी त्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले , तेथून सदर तरुण बेशुद्ध अवस्थेतच असल्याने त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवलेआसुन पोलिसांनी अद्याप पर्यंत कुणावरही कारवाई केली नाही त्यामुळे इतका गंभीर प्रकार घडला असूनही पोलिस काहीच कारवाई करत नसल्याने ते आरोपींना पाठीशी तर घालत नाहीना अशी सामान्य नागरिकांच्या मनात शंका उत्पन्न झाली आहे.त्यावेळी रीपाई नेते कैलासभाई पगारे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना सबंधित जातीवादी गावगुंड अशोक बोरसे याच्यावर अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३(१) , कलम३(१)s तसेच भा. द.वी.कलम ३०७, ३२६,३०५,३०६, अंतर्गत त्वरित कारवाई करून त्याला त्वरित अटक करा अशी मागणी केली असून कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला असून त्यावेळी रिपाई नेत्या जयश्रीताई वाघ, सचिन वाघ,मालेगाव युवा शहर अध्यक्ष सुशिल उशिरे , बिपिन निकम, दतू निकम , भाऊसाहेब निकम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या