Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे निम्मे शहर अंधारात महावितरण विरोधात नागरिकांमधून रोष

 

महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे निम्मे शहर अंधारात महावितरण विरोधात नागरिकांमधून रोष 

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

मनमाड (ता.10)महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मनमाड शहरातील परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार - पाच दिवसांपासून निम्मे शहर अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.  (ता. 10) रात्री  पूर्ण गाव अंधारात सापडला आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे. सध्या गणेशोत्सव,ईद ए मिलादुन्नबी, बैल पोळा सणाचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या गेंड्याच्या कातडीच्याअधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्‍कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्‌द्‌याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. 

अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन गणेशोत्सव सुरू होणार असून नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.  - गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी असल्यामुळे हे उपकेंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. . वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

मनमाड शहरांमध्ये महावितरण चा वीज पुरवठा खंडित झाल्यावर रात्री अपरात्री महावितरण चा भोंगळा कारभाराला समस्त मनमाडकराणा सामोरे जावे लागते अत्यावश्यक सेवा म्हणून महावितरण कार्यालयाला मनमाड शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास टाळे लावून आत मध्ये कर्मचारी मस्त आरामात झोपा काढत असतात तक्रार करण्याची सोय नाही या भोंगळ्या कारभाराबद्दल मनमाडकर संताप व्यक्त करतील का? अधिकारी मुख्यालय न राहता नाशिक येथून अपडाऊन करतात .

(गुरु कुमार निकाळे रिपाइं युवा तालुका अध्यक्ष)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या