आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांच्या सौजन्याने, फिरता चषक कबड्डी स्पर्धा संपन्न
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
मनमाड- येथील उदय क्रीडा व व्यायाम मंडळ आयोजित व माननीय आमदार. सुहास अण्णा कांदे यांच्या सौजन्याने प्रायोजित शहर पातळीवरील फिरता चषक कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेचे उद्घाटन सुनील हांडगे, मयूर बोरसे ,संतोष अहिरे व लोकेश साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 15 संघांनी सहभाग नोंदवला होता. कै. रंगनाथ मुरलीधर कातकडे यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत रंगनाथ कातकडे यांच्याकडून देण्यात आलेले प्रथम पारितोषिक (रुपये सात हजार )एकलव्य क्रीडा मंडळाने पटकावले. कै. हेमंत आव्हाड यांच्या स्मरणार्थ . धनंजय पुंडलिक आव्हाड यांच्याकडून देण्यात आलेले पाच हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक सम्राट क्रीडा मंडळाने मिळवले. कै. अनिल अण्णा कातकडे यांच्या स्मरणार्थ , राजेंद्र एकनाथ कातकडे यांच्याकडून रोख तीन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक भारत माता क्रीडा मंडळास मिळाले. तर शेख रुस्तम शेखलाल यांच्या स्मरणार्थ आनंद ज्युस सेंटर मार्फत देण्यात आलेले अकराशे रुपयांचे चतुर्थ पारितोषिक उदय क्रीडा मंडळाने मिळविले. पारितोषिक वितरणाप्रसंगी मा. नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे , चंद्रकांत कातकडे श्री सुनील हांडगे, मयूर बोरसे ,संतोष अहिरे , मुकुंद झाल्टे पापा थॉमस प्रकाश शेजवळ राकेश ताठे दिलीप सूर्यवंशी परशुराम झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते विजयी संघांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत पंचप्रमुख म्हणून सर्वश्री सतीश सूर्यवंशी राजेश निकम यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अमोल कातकडे, विक्रम शाहू, सचिन पगारे ,दत्तू जाधव, सुधाकर कातकडे, प्रवीण देठे, राजेश डमरे, पीटर फेरो, धनंजय आव्हाड, अजय साळवे व उदय क्रीडा मंडळाचे इतर सर्व आजी-माजी खेळाडूंचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या