Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मनमाड मुस्लिम बांधवांची प्रार्थना


 डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मनमाड मुस्लिम बांधवांची प्रार्थना.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर  मुस्लिम बांधवांनी, 10 सप्टेंबर रविवारी रोजी पावसासाठी  सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना (दुवा) केली.

मुफ्ती हामीद जफर,रहेमानी साहब,मालेगाव यांनी यावेळी राज्यात सर्वत्र पाऊस पडावा, यासाठी नमाज इस्तेस्का (पावसाची नमाज ) पठण केली व अल्लाकडे प्रार्थना करताना म्हटले की, "ईश्वर,अल्लाह ताआला समस्त मानव जातीसाठी, पशू- पक्ष्यांकरिता जिथे जिथे पाऊस नाही तेथे फायदा देणारा पाऊस पडू दे,

 


आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा सर्वांना माफ कर, आम्हा सर्वांवर दया कर. आमचे शेतकरी बंधू चिंतेत आहे आम्हाला आणि मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही,नफा देणारा भरपूर पाऊस पडू दे, प्रत्येक मनुष्य आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू होऊन तीन ते चार महिने होत आहेत. हे अल्लाह (ईश्वरा) समस्त जिवांवर  रहमत (कृपा) कर" अशी आर्तपणे प्रार्थना केली प्रार्थना करत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

तसेच भारताची प्रगती आणि देशात शांतता नांदावी यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली.यावेळी मुफ्ती हामीद जफर,रहेमानी,साहब, मालेगाव, नगीना मस्जिद ईमाम, मौलाना उस्मान साहब, मौलाना तौसिफ़ आलमागिरी, मुफ्ती फैजल साहब, मुफ्ती आसिम साहब, मुफ्ती साकिब साहब, हाफिज अय्युब साहब, मौलाना, वसीम,मौलाना,कामील, हाफिज जाकीर, हाफिज साजिद रहमत नगर, हाफिस अफ्फान, हाफिज मुबीन, हाफिज साजिद, शहरातील इतर मौलाना आदींसह  मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.


या वेळी पोलीस बंदोबस्त व सहकार्य केल्या बद्दलमनमाड शहर मुस्लिम बांधवाना तर्फे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, व देवकाते साहेब, तसेच पोलीस प्रशानाचे आभार व्यक्त करण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या