मनमाड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ, इतके जण
जखमी,पालिका प्रशासानाने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नागरिकांमधून रोष.
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.
मनमाड.शहरातील डॉ.आंबेडकर नगर व सिकंदर नगर.येथे पिसाळलेल्या मोकाट, कुत्र्याने एकाच दिवशी सात ते आठ लहान मुले व वयोवृद्दांना चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
मनमाड येथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढत चालले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. तर एकाच दिवशी सात ते आठ मुलांना वयोवृद्ध नागरिकांना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट पिसाळलेली कुत्रे स्थानिक नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी होतील अशी अवस्था करुन सोडत असल्याचा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे.
या मुलांना व वयोवृद्दांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत
तर काही दिवसांपूर्वी ईदगाह विभाग व I.U.D.P. येथे भटक्या कुत्र्याकडून एकाच दिवशी चार ते पाच स्थानिकांना चावा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये पिसाळलेल्या एका कुत्र्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना चावा घेतला होता. यामुळे काही विद्यार्थ्यांना हातापायाला जखमा झाल्या आहेत. एवढेच नाही तर काही स्रिया आणि पुरुषांना सुद्धा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर भटक्या कुत्र्यांच्याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच
उप जिल्हा रुग्णालया मनमाड मध्ये प्रती दिवस 10 ते 12 कुत्रा चावल्याचे रुग्ण येत असून, शहरात खूप मोठ्या प्रमाणावर कुत्रा चावल्याचे घटना घडल्या आहेत.मागील काही महिन्यांपासून जन आवाज न्यूज तर्फे उप जिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांचे कडून माहिती घेतली होती सदर माहिती ही धक्कादायक आहे,
उप जिल्हा रुग्णालयात कुत्रा चावल्याचे दर रोज 10 ते 12 रुग्ण येत असून, सरासरी मार्च व एप्रिल मध्ये 600 शे लोकांना कुत्रा चावल्याची माहिती हाती लागली आहे.
मोकाट, पिसाळलेले कुत्रे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे अक्षरशः लचके तोडत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना मनमाड पालिका प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. सर्वसामान्य नागरिक मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी शहरातील सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. तरीही काहीएक उपयोग होत नसल्याचे नागरिकांन तर्फे सांगण्यात येत आहे,
पालिका प्रशासनाने लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांच उपाय योजना करावी अशी नागरिकांतर्फे मांगणी होत आहे,
मनमाड शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने भितीचे वातावरण असून डॉ.आंबेडकर नगर, सिकंदर नगर भागात अनेकांना चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले आहे. यात लहान मुलांचा समावेश आहे. पालिका प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.. गणेशोत्सवात देखावे पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढत असून पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका वाढला आहे. यातून गंभीर प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील.
- प्रवीण पगारे, बहुजन समाज पार्टी नांदगाव - विधानसभा
0 टिप्पण्या