मनमाड महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न.
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.
मनमाड.महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विचार करायला शिकवेल का? या विषयावर व्याख्यान संपन्न झाले
यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. विजयकुमार वावळे उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतात नवीन शैक्षणिक धोरण 2020 यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला त्यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेतील उनिवा विद्यार्थ्यांसमोर मांडल्या शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवेल का यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला या शैक्षणिक धोरणात संधीची समानता निर्माण करणे खूप कठीण गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले या शैक्षणिक धोरणातील क्रेडिट सिस्टम विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण करणारी आहे असे त्यांनी सांगितले
या शैक्षणिक धोरणाचा विचार करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना या जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळविणे व गणिताचे ज्ञान महत्त्वाचे आहे असे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. याप्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी एस देसले यांनी शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यात संप्रेषण होणे महत्त्वाचे आहेत व नवीन शैक्षणिक धोरण लागू करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या समजून घेतल्या पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले
याप्रसंगी चांदवड महाविद्यालयाचे डॉ. आर जे इंगोले महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा.डॉ. जे. वाय. इंगळे, डॉ. आर डी भोसले तसेच वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. मिलिंद अहिरे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. आर एस लोखंडे सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.भोसले यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका अलका नागरे तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश जावळे यांनी मानाले.
0 टिप्पण्या