Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

लोहमार्ग पोलीस ठाणे मनमाड यांची कामगिरी जबरी चोरीचे चार गुण्यासह एकूण पाच गुन्हे उघड.



लोहमार्ग पोलीस ठाणे मनमाड यांची कामगिरी जबरी चोरीचे चार गुण्यासह एकूण पाच गुन्हे उघड. 

मनमाड प्रतिनिधी.अनिस शेख.

 दिनांक 16 8 2023 रोजी फिर्यादी अजय भावसार राहणार दुर्गपुर राजस्थान. हडपसर पुणे एक्सप्रेस ने प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन मनमाड येथे यातील अनोळखी इसमाने त्यांची गळ्यातील चैन जबरीने तोडून नेल्याबाबत मनमाड पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास सुरू असताना रेल्वे सुरक्षा बल व जीआरपी यांच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाचे विश्लेषण करून यातील आरोपी नामे मुख्य आरोपी प्रवीण श्रीमंत काळे प्रवीण श्रीमंत काळे व इंडियन श्रीमंत काळे यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल देऊन गुन्ह्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याचे चेन लगड स्वरूपात हस्तगत केली तसेच त्याच्याकडून रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे दाखल असलेले इतर 03 जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले असून व एक चोरीचा गुन्हा उघडकीस करण्यात आला असून असे एकूण पाच गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत व पाचही गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपूर्ण मालमत्ता सोन्याची 44 ग्रॅम एकूण किंमत अंदाजे दोन लाख 50 हजार किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आलेली आहे

सदरची कामगिरी लोहमार्ग औरंगाबाद मा. पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील मॅडम , मां.पोलीस अधीक्षक श्री गणेश शिंदे सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मारुती पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे ,पोलीस उपनिरीक्षक संपत राठोड, सुरेश सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश पवार, पोलीस हवालदार रवींद्र खडतकर पोलीस नाईक महेंद्र पाटील ,संतोष भालेराव, सुशील भावसार ,किशोर कांडले अमोल खोडके ,पोलीस शिपाई राज बच्छाव ,मनजीत पाटील यांनी पार पाडली तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप देस्वाल , धर्मेंद्र यादव सागर वर्मा ,मनीष कुमार दीपक सानप आदींनी पार पाडली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या