Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मराठा समाज सोबत महाविकास आघाडी तर्फे, जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जाचे निषेधार्थ मनमाड शहरात आंदोलन,

 


मराठा समाज सोबत महाविकास आघाडी तर्फे, जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जाचे निषेधार्थ मनमाड शहरात आंदोलन, 

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

मनमाड :- जालन्यात गुरुवारी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जाचे पडसाद सोमवारी ही राज्यभरात दिसून येत आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी राज्य सरकारविरोधात आंदोलनं केली जात आहेत.मनमाड शहरातील समस्त मराठा समाजास सोबत घेवून महाविकास आघाडी तर्फे मनमाड शहरात एकात्मता चौक येथे आंदोलन करण्यात आले,


आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर पायाखाली तुडवून राज्य सरकारचा घोषणा देत निषेध व्यक्त केला.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱया मराठा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्ज करत केलेल्या हल्याच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे, 

मनमाड ( दि.४)जालना जिल्ह्यातील अंतरवली या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर जालना पोलीस विभागाने बळाचा वापर करुन लाठीचार्ज व हवेत गोळीबार करण्यात आला तसेच सदर ठिकाणी असलेल्या लहान मुलं व महिलांवर तीव्र लाठीचार्ज करत मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला असून याचा मराठा समाजाच्या वतीने ठीक ठिकाणी जाहीर निषेध केला जात आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यानी सदर घटनेची नैतीक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे.


 गेल्या चार दिवसांपासून सदर आंदोलन शांततेने सुरु होते. मात्र गुरुवारी पोलीसांनी आंदोलनकर्त्यावर अमानुष लाठीचार्ज केला त्यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले त्यामध्ये लहान मुले व महिलांचा संख्या लक्षणीय होती. मराठा समाजाचा आरक्षणासाठी लोकशाही पध्दतीने सुरु असलेला लढा दडपशाही पध्दतीने चिरडून टाकण्यासाठी पोलीस विभागातर्फे करण्यात आलेली सदर अमानुष लाठीचार्जची घटना संपूर्ण मानवतेला काळिमा फसणारी व मानवतेसाठी अत्यंत निंदनीय आहे, हे राज्य सरकारचे हे कृत्य अत्यंत लाजीरवाणी आहे हा लाठीचार्ज व हवेत गोळीबार कोणाच्या आदेशाने करण्यात आला त्याची माहिती राज्य शासनाने जाहीर करण्यात यावी. 

आंतरवाली सराटीच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद उमटू नयेत, म्हणून शांततेने सुरू असलेले हे आंदोलन चिरडण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाला आणि तसे निर्देश फडणवीसांच्या गृहखात्याने पोलीस यंत्रणेला देले. सरकारविरुद्ध उठणारा कुठलाही आवाज असो वा आंदोलन, ते हुकूमशाही पद्धतीन चिरडून टाकणे किंवा सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकणे, हा 'दिल्ली दरबार'चा फॉर्म्युला आता फडणवीस सरकारनेही राबवायचे ठरवलेले दिसते. यापूर्वी महाराष्ट्रातील मराठा समाज सातत्याने आरक्षणासाठी लाखोंचे संख्येने मोठे शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले आहे,


एक ठिणगी कुठे पडली असती तर वणवा पेटायला वेळ लागला नसता. पण मराठा आंदोलक सदैव संयम बाळगूनच आंदोलने करत असताना आंतरवाली सराटीत पोलिसांचा फौजफाटा घुसवून जालियनवाला बाग घडवण्याचे फर्मान फोनवरून कोणी सोडले ? आंतरवालीत अमानुष लाठीहल्ला व गोळीबाराचे आदेश देणारा जनरल डायर कोण ? याचा छडा लागलाच पाहिजे! आंतरवालीच्या घटनेनंतर झालेला उद्रेक पाहून सटपटलेल्या सरकारने आता जालन्याच्या पोलीस प्रमुखांना सक्तीच्या रजेवर पाठवले; पण या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. एकीकडे सरकार म्हणते काय आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत दुसरीकडे हिंदू मराठा समाजातील लोकांना लाठीचार्ज करत गोळ्या झाडल्या व पुरुषांन सोबत महिला व लहान मुलांचे रक्त सांडण्यात आले  आंदोलन करणारे मराठा समाज बांधव हे पाकिस्तानी होते का असा खोचक प्रश्न (समाजसेवक विठ्ठल नलावडे) यांनी आंदोलनात केले, या वेळी मराठा समाज सोबत महाविकास आघाडी चे असंख्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या