Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

येवला नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख यांच्या वर शिस्तभंगाची करावाई करा RTI कार्यकर्ते सागर साळी यांची निवेदना द्वारे मागणी...

 

येवला नगरपरिषदेचे आस्थापना प्रमुख यांच्या वर शिस्तभंगाची करावाई करा RTI कार्यकर्ते सागर साळी यांची निवेदना द्वारे मागणी...

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड :- येवला येथील RTI कार्यकर्ते .सागर एकनाथ साळी..यांनी दि.05/06/2023 रोजी जनमाहिती अधिकारी तथा आस्थापना प्रमुख येवला नगर परिषद यांचेकडे माहिती अधिकार अर्ज करून माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती मागितली होती... दि.१०/०७/२०२३ रोजी अस्थांपना विभागाकडून अपूर्ण पुरवण्यात आली होती.

म्हणून RTI कार्यकर्ते सागर साळी यांनी दि.17/7/2023 रोजी प्रथम अपील मा मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला यांचेकडे दाखल केले होते.त्यावर दि 11/8/2023 रोजी सुनावणी घेण्यात आली होती.प्रथम आपिलीय अधिकारी तथा मुख्याधिकारी येवला यांनी दि.11/8/2023 रोजी लेखी आदेश पारित केले होते की.. आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात अपूर्ण असलेली माहीती विनामूल्य अर्जदारास उपलब्ध करून द्यावी तसेच सदर माहिती विहित मुदतीत देण्याची दक्षता घ्यावी... परंतु, जनमाहिती अधिकारी यांनी 17 दिवस विलंबाने दि.7/9/2023 रोजी पत्रव्यवहार करून अपूर्ण असलेली माहिती पूर्ण करून दिली असे भासविले...परंतु त्यांनी

आदेश प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात अपूर्ण असलेली माहिती अर्जदारस दिली,

म्हणून जनमाहिती अधिकार तथाआस्थापना प्रमुख येवला नगर परिषद यांनी मुख्याधिकारी साहेब येवला यांचे आदेशास केराची टोपली दाखवली व माहिती अधिकाराची खिल्ली उडवली.तसेच कर्तव्यात कसूर केली आहे. तरी मा.मुख्याधिकारी साहेब येवला नगर परिषद येवला यांनी जनमाहिती अधिकार तथा आस्थापना प्रमुख येवला नगर परिषद विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मांगणी निवेदन द्वारे, RTI कार्यकर्ते सागर साळी यांचे तर्फे करण्यात आली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या