RMBKS असंघटीत कामगार शाखाचे राज्य अधिवेशन मनमाड येथे संपन्न, 

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड :- RMBKS असंघटीत कामगार शाखाचे राज्य अधिवेशन मनमाड येथे 550 कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाले, या ट्रेड युनियनचे, महाराष्ट्राचे अध्यक्ष - राजेंद्र राजदीप तसेच तक्रार  निवारण समितीचे मुख्य राज्य संयोजक प्रा. डॉ. मोहन मिसाळ यांच्या मुख्य उपस्थितीत राज्य प्रभारी प्रा. डॉ. संघरक्षित भदरगे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले, की


भव्य राज्य स्तरीय असंघटित कामगार परिषद आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रच नव्हे तर भारत देशातील इतिहासातील असंघटित कामगार क्षेत्रातील,बांधकाम ,पेंटर, विणकर घरकाम करणाऱ्या महिला कामगार, शेतमजूर , अशा  प्रकारच्या ३४० पेक्षा अधिक प्रमाणात असणाऱ्या असंघटित कामगारांच्या समस्या बाबत आवाज उठविण्यासाठी कोणतेही  संघठण पुढे आले नाही

प्रथमच राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनाने असंघटित विंग निर्माण करून सर्व सामान्य बांधकाम कामगार आणी विणकरासह  इतर सर्व  असंघटित कामगारांची मोठ बांधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य स्तरीय अधिवेशन मनमाड येथे आयोजित करण्यात आले आहे, राष्ट्रीय अध्यक्ष - मा. वामन मेश्राम साहेब यांनी RMBKS असंघटीत कामगार शाखा हे राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आश्वासन दिले,  या अधिवेशनात


1) शहर स्तरावर मुख्य अधिकारी व ग्रामीण स्तरावर ग्रामसेवक यांच्या द्वारे 90 दिवसाचे प्रमाणपत्र प्रमाणित करणे संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करावे

2) जे मुख्य अधिकारी/ वॉर्ड निरीक्षक व ग्रामसेवक/गट विकास अधिकारी बांधकाम कामगारांची ओळखीची खात्री झाल्यावरही 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तात्काळ देण्यास दप्तर दिरंगाई करतील त्या संबंधितांवर शिस्तभंग कार्यवाही करण्याचे शासन परिपत्रक निर्गमित करावे.

3) 340 असंघटीत कामगारांचे 39 उद्योग क्षेत्राचे 39 सामाजिक सुरक्षा महामंडळ स्थापन करावे.

4) 340 असंघटित कामगारांच्या राज्य सामाजिक सुरक्षा महामंडळमध्ये नोंदणी करण्यासाठी तालुकास्तरावर नोंदणी कार्यालय स्थापन करावे.

5) सर्वच असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभाचे स्वरूप एक समान करण्यात यावे. असे ठराव एकमताने पारीत करण्यात आले, या ठराव मागिनी प्रमाणे शासनाने शासन निर्णय काढण्यावे असे पत्र व्यवहार RMBKS असंघटीत कामगार शाखा तर्फे करण्यात येणार आहे, वेळ पढल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची शाखेने दर्शविलेली आहे,