जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003.
मनमाड :-मनमाड तलाठी कार्यालय हे ब्रिटिश कालीन असून कार्यालय हे मोडकळीस आले आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाची ही अवस्था झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मनमाड परिसरात महसूल विभागाचे अनेक वर्षे जुने ब्रिटिशकालीन तलाठी कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत मनमाड शहर 1 व मनमाड शहर 2 समावेश आहे. मनमाड तलाठी कार्यालयात मनमाड शहराचे अंदाजे 1200 शे पेक्षा जास्त जमिनीचे उतारे,व 300 पेक्षा जास्त शेत जमिनीचे उतारे आहे व त्या लगत फेरफार, गाव नमुना, पंचनामे व इतर शासकीय अधिकार अभिलेख आहे, परंतु पाऊस व कार्यालय गळतीमुळे या अधिकार अभिलेखाला धोका निर्माण झालेला आहे
मनमाड शहर तलाठी कार्यालय शासकीय कामांसाठी नागरिकांची वर्दळ या कार्यालयात असते. पण महसूल विभागाने येथील दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. छपरावरील कौले निखळू लागली आहे, पाऊसात कार्यालय पाणी गलती सुरु झाली आहेत, भिंतीही पडझड होण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाला या कार्यालयामार्फत मोठय़ा प्रमाणात महसूल मिळत असतानाही कार्यालयाचे नूतनीकरण न करण्याचे कारण कळत नाही. पावसाळय़ात दरवर्षी छपरातून पाणी गळती होते. छपरावरील कौलेवर ताडपत्री लावावी लागते. तसेच जुन्या बांधकामामुळे एखादा अपघात घडल्यास आणि नागरिक अथवा कर्मचारी जखमी झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असेल ? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे,
शासनाच्या महसूल विभागाचे प्रथम कार्यालय म्हणजे तलाठी कार्यालय आहे, या कार्यालयात गावकामगार तलाठी तर्फे महसूली कामकाज द्वारे नागरिकांचे अभिलेख, सात बारा उतारे, खाते उतारे, फेरफार नोंदी, पीक पहाणी अर्ज, असे अनेक दस्त निर्माण होतात,या कार्यालयात नागरिकांचे सर्व रेकॉर्ड जतन देखील केले जातात,
शासना तर्फे तलाठी कार्यालयास एवढं महत्व आहे की शासना तर्फे तलाठी कार्यालयास सार्वजनिक चावडी म्हंटले गेले आहे, परंतु पाऊसामुळे होणाऱ्या गळती मुळे अधिकार अभिलेख नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे,
शासन प्रशासनाला या कार्यालयामार्फत मोठय़ा प्रमाणात महसूल मिळतो याला दुर्लक्ष करता येणार नाही, तरी शासनाने मनमाड तलाठी कार्यालयाचे तात्काळ नूतनिकरण करावे, मनमाड शहरासाठी तलाठी कार्यालय नवीन इमारत करावी त्या नूतन इमारतीत पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छता गृहाची सोबत नागरिकांना बसण्याची, अशी मूलभूत सुविधा देखील मिळावी अशी मांगणी शहरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे,
0 टिप्पण्या