Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

धुळगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शेखर गायकवाड तर व्हा चेअरमन वाल्मीक जाधव यांची बिनविरोध निवड

 

धुळगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शेखर गायकवाड तर व्हा चेअरमन वाल्मीक जाधव यांची बिनविरोध निवड

 प्रतिनिधी शशिकांत जगताप.

येवला तालुक्यातील धूळगांव विविध कार्यकारी सहकारी संस्था ली च्या चेअरमन पदी श्री शेखर कारभारी गायकवाड व व्हा चेअरमन पदी श्री वाल्मीक पंढरीनाथ जाधव यांची सर्वानुमते संचालक मंडळाच्या वतीने बिनविरोध निवड करण्यात आली 
मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक तथा निवडणूक प्राधिकरन नाशिक याच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी अधिनस्थ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला .प्रथम श्रेणी एक  श्री राजेंद्र साळवे यांच्या अध्यक्षतेखाली दि.18/08/2023 वार शुक्रवार संपन्न झाली

 निवडणूक कामकाज संस्थेचे सचिव श्री रमेश गणपत गायकवाड व क्लर्क श्री बाबासाहेब रघुनाथ गायकवाड यांनी कामकाज पाहिले. यावेळी संस्थेचे माजी चेअरमन श्री दत्तात्रय विठ्ठल गायकवाड व माजी व्हा चेअरमन प्रकाश सोनू सोनवणे व संचालक मंडळ व सभासद यांनी नवनिर्वाचित उभयतांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    शेतकरी हितासाठी व फायद्यासाठी कर्ज वाटप तसेच वसुली आणि सभासद नोंदणी यावर भर देऊन प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित चेअरमन शेखर गायकवाड व वाल्मिक जाधव यांनी सभासदांना तसेच संचालक मंडळाला विश्वासाचा शब्द दिला यावेळी अर्जुन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड ,राजेंद्र गायकवाड , कारभारी गायकवाड, पांडुरंग गायकवाड ,दीपक गायकवाड, संजय गायकवाड, विक्रम गायकवाड ,मंगेश आहेर, भास्कर वाळके, मोहन खोडके, नारायण बारहाते, समाधान सरोदे या संचालक मंडळासह काबू दादा गायकवाड, दत्तू गायकवाड , योगेश गायकवाड ,मिटके मामा, विनायक जाधव, कैलास खोडके, भीमराज गायकवाड, रामेश्वर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, माणिकराव सूर्यवंशी ,बाळू नाना गायकवाड, दीपक जाधव यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या