Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषद अधिकारी वर्ग, आपले व्यक्तिगत हित संबंध जपण्यासाठी, मे न्यायालयाचे देखील अवमान करत आहे, ऍड फरिदा मिठाईवला ने दिला मनमाड नगर परिषदेला आंदोलनाचा ईशारा,

 

मनमाड नगरपरिषद अधिकारी वर्ग, आपले व्यक्तिगत हित संबंध जपण्यासाठी, मे न्यायालयाचे देखील अवमान करत आहे, ऍड फरिदा मिठाईवला ने दिला मनमाड नगर परिषदेला आंदोलनाचा ईशारा,

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड :- नगीना कॉम्पलेक्स व शेजारी मिळकत मध्ये सार्वजनिक वहिवाट असून मा,मे न्यायालय मनमाड यांनी आदेश पारीत केले आहे की,शेजारील मिळकतधारक यांचे हवा, पाणी, उजेड,व इतर असे हक्क प्राप्त असून संबंधित मनमाड नगर परिषद मुख्यधिकारी व नगराध्यक्ष यांनी भविष्यात कोणत्याही पद्धतीने अतिक्रमण करण्यात येऊ नये, असे आदेश पारीत केले आहे,

परंतु मनमाड नगर परिषद तर्फे नगीना कॉम्पलेक्स येथील आपल्या गाळे धारकांना अवैध रित्या, अनधिकृत अतिक्रमण करण्याची मुभा देत पाठराखण करत आहे,

नगीना कॉम्पलेक्स येथील गाळेधारक हे अनधिकृत अतिक्रमण करत असून सदर अतिक्रमण तात्काळ निष्कासित करून मिळावे अशी लेखी तक्रार ऍड फरिदा मिठाईवला यांनी मनमाड नगरपरिषद यांना जानेवारी 2023 मध्ये केली होती, परंतु सात महिन्याचे कालावधी पेक्षा जास्त विलंब होऊन ही अनधिकृत अतिक्रमण वर कारवाई ही करण्यात आलेली नाही, नाईलाजाने माहिती अधिकार अधिनियम अन्वये अर्ज करून कारवाई बद्दल नगर परिषदला विचारणा करण्यात आली, परंतु अर्ज करून सुद्धा नगर परिषद तर्फे काही एक माहिती देण्यात आली नाही, व काही कारवाई देखील करण्यात आली नाही,

मनमाड नगर परिषदने जानुबुजून केलेल्या हलगर्जी व गलथान कारभारामुळे, आज पर्यंत अनधिकृत अतिक्रमण हे जसे का तसेच आहे, उलट जुन्या अतिक्रमणला बघून नवीन अतिक्रमण तयार होत आहे,

दि 29/07/2023 रोजी नवीन अतिक्रमण होतांना मुख्यधिकारी साहेब यांना Whats App वर फोटो पाठवून लेखी तक्रार करण्यात आली व तात्काळ काम थांबवण्याची फोन करून विनंती करण्यात आली, परंतु मुख्यधिकारी साहेबांनी फक्त उडवा उडवीचे आश्वासन दिले व वेळ काढुपणा करत अतिक्रमण धारकाला अतिक्रमण करण्याचे पूर्ण वेळ दिले, मे न्यायालयाचे आदेशाची अवमानना करून आज पूर्ण पणे नवीन अतिक्रमण झाले आहे, यास मनमाड नगर परिषद चे मुख्यधिकारी व इतर अधिकारी वर्ग जबाबदार आहे,

मनमाड नगर परिषद अधिकारी हे आपले हीत संबंध जपण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करण्याची मजल देखील मारत आहे, 

दि 31/07/2023 सोमवार पर्यंत जर नगर परिषदने हे आपले अनधिकृत अतिक्रमण निष्कासित केले नाही तर, आम्ही 01/08/2023 मंगलवार पासून बे मुदत उपोषण करणार आहे, याची सर्वस्वी जबाबदारी ही मनमाड नगरपरिषद मुख्यधिकारी व अधिकारी यांची राहील, 

मा, न्यायालय आदेशाचे अवमानना करून, जर शहरात अधिकारी हे अनधिकृत अतिक्रमण करण्याची परवानगी दिली जात असेल ,तर मोठी आर्थिक संबंध असल्याची शक्यता ही नाकारता येत नाही, आयुक्त तथा संचालक साहेब नगरपरिषद व जिल्हाधिकारी साहेब यांनी योग्य चौकशी करून, कोर्टाचे अवमान करणाऱ्या दोषी अधिकारीवर निलंबनाची कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया ऍड फरिदा यांनी वृत्तपत्रकला बोलतांना व्यक्त केली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या