Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड येथे केंद्र व राज्य पुरस्कृत योजनाचा लाभार्थी मेळावा संपन्न




जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार 

मनमाड.दि. 12 जून 2023 सोमवार रोजी केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत ‘स्वनिधी से समृद्धी’ कार्यक्रम तसेच तालुका स्तरावरील ‘शासन आपल्या दारी अभियान’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री, भारत सरकार ,मा. ना.डॉ.भारतीताई पवार यांनी केंद्र व राज्य शासनाचे रोजगार, आरोग्य, DAY-NULM, PMSVANidhi, PMAY, PMFME, अशा प्रधानमंत्री नावाने चालणार्‍या अनेक योजनाची माहिती देऊन त्याचा फायदा घेण्याचे आवाहन केले. आणि नांदगाव मतदारसंघाचे माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त विषयांचे सादरीकरण पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न पा.चे सभा लिपिक श्री किरण आहेर यांनी तर, कार्यक्रमाची रूपरेषा व परिचय मनमाड परिषदेचे व्यवस्थापक डॉ. संदीप आगोणे यांनी केले, तर प्रस्तावना नगरपालिकेचे मुख्यअधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी केले.  पंचायत समिती नांदगावचे गटविकास अधिकारी श्री.गणेश चौधरी यांनी ग्रामीण भागात राबवल्या जाणाऱ्या योजनाबद्दल माहिती दिली, तसेच तहसीलदार नांदगाव, डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या सूचनेनुसार सर्वांचे स्वागत सत्कार करून लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यात आला. यात नगरपरिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरि उपजीविका अभियान 812 लाभार्थी उपस्थित होते. याअंतर्गत विविध स्वयंरोजगार कर्ज वितरण कार्यक्रम पार पडला, तसेच प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत 751 लाभार्थी पैकी 180 लाभार्थ्यांना परिचय बोर्डचे वाटप करून काही लाभार्थ्यांना सदर योजनेचा धनादेश वाटप करण्यात आला, तसेच शासन आपल्या दारी अभियानांतर्गत विविध प्रकारचे दाखले किंवा परवानगी या जागेवर देण्यात आल्या यासाठी 20 स्टॉल लावण्यात आले होते सदर स्टॉलमध्ये लाभार्थ्यांनी विविध प्रकारचा सेवेचा लाभ घेतला. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 206 लाभार्थ्यांचा तक्रारी प्राप्त झाल्या. प्रतींनिधिक स्वरुपात 10 लाभर्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले तालुकास्तरावरून राबवण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर या योजनेअंतर्गत सामाजिक तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण 28 महिलांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यात 1610 महिला उपस्थित होत्या त्यात एकूण 956 तक्रारी अर्ज प्राप्त झाले. तसेच मनमाड शरातील एकूण 6 बँकेचे अधिकारी, 2 नगरपरिषदेचे अधिकारी, 4 आशा वर्कर अशा विविध घटकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास दिवसभर एकूण 3173 लाभार्थ्यांची उपस्थिती होती. 

याप्रसंगी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष अतिथी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.श्री.  कैलासजी विजय वर्गीय,यांनी केंद्र शासनाच्या धोरणाबाबत मार्गदर्शन केले तर , मा.आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावळ, आमदार पत्नी अंजुमताई सुहास कांदे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्री केदा नाना आहेर, मा.खासदार,गोवा, श्री. विनय तेंडुलकर, सुनील बच्छव, श्री.नितीनजी पांडे, श्री. सचिन दराडे, श्री पंकज खताळ, जय फुलवाणी, श्री गणेश शिंदे, दत्तराज छाजेड, उमेश उगले, बापू पाटील, अकबर शाह, पंचायत समिती नांदगाव चे सुरेश पारखे , प्राची पवार प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. सीमा वानखेडे, सौ रेखा गांगूर्डे , सोपान कदम उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या