जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार
जन्म मृत्यू नोंदणी,विभागाच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध,कादीर शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उप मुख्य निबंधक साहेब, जन्म मृत्यू विभाग यांना लेखी तक्रार,
प्रत्येक शासकीय कार्यालयात काही भ्रष्ट्र अधिकारी/कर्मचारी असतात, भ्रष्ट्राचारासाठी ते कुठलेही स्तरावर जाऊन बेकायदेशीर चुकीचे कार्य करतात,
अश्याच प्रकारे जन्म मृत्यू नोंदणी विभागाने अजब कमाल केले आहे, एका व्यक्तीचे दोन वेग वेगळे तारखेचे मृत्यू दाखले,जन्म मृत्यू नोंदणी,विभागाच्या वतीने देण्यात आलेले आहे,
जन्म मृत्यू नोंदणी कार्यालया कडून, एकच व्यक्तीचे दोनदा मृत्यू दाखले देण्यात आले आहे, नवल म्हणजे दोन्ही मृत्यू दाखल्याची मृत्यूची तारीख वेगळे वेगळी असून मृत्यू नोंदणीची तारीख देखील वेग-वेगळी आहे, मात्र मृत्यू व्यक्तीचे नाव हे एकच आहे, तो व्यक्ती दोनदा कसा मेला.?असा प्रश्न निर्माण झाला आहे,
भ्रष्ट्राचारासाठी शासकीय कर्मचारी हे कोणत्या स्तरावर जातील याचे नेम नाही,
तसेच एका प्रकरणात एका जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाने भारतीय जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 2000 हया कायद्याचे कलम 10 भंग केला आहे, कलम 10 प्रमाणे मृत्यू नोंदणी नंतर, मृत्यू दाखला देतांना मृत्यूचे करणाचे वैद्दकीय प्रमाणपत्र घेणे हे निबंधकास बंधनकारक आहे, परंतु असे असतांनाही, संबंधित निबंधक यांनी,सन 2013 ची मृत्यू नोंदीत सन 2021 मध्ये मृत्यू दाखला दिला, परंतु मृत्यूचे करणाचे वैद्दकीय प्रमाणपत्र न घेता सदर मृत्यू दाखला दिलेला आहे, संबंधित निबंधक यांनी भ्रष्ट्राचारासाठी जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 व 2000 चे कलम 10 चे भंग केले आहे,
तसेच जन्म मृत्यू निबंधक हे केंद्र शासनाच्या परिपत्रकाला व महाराष्ट्र राज्यचे उप मुख्य निबंधक साहेब, यांच्या आदेशाला जुमानत नाही, वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला निबंधक हे केराची टोपली दाखवत आहे, थेट महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्य निबंधक यांनी दिलेल्या आदेशाची अमलाबजावणी करण्यास नकार देत आहे, मंग राज्य स्तरीय आदेशाला काय अर्थ उरला आहे,
महाराष्ट्र राज्य उप मुख्य निबंधक साहेब यांच्याशी सविस्त्तर विषयावर चर्चा करून पुराव्याणीशी त्यांना लेखी तक्रार देण्यात आलेली आहे, व संबंधित कर्मचारी व त्यांना प्रोस्थाहन देणारे अधिकारी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी लेखी मांगणी करण्यात आली आहे, व माननीय राज्याचे उप मुख्य निबंधक साहेब हे तात्काळ कारवाई करतील अशी अपेक्षा
वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हा सचिव कादीर शेख यांनी व्यक्त केली आहे,
0 टिप्पण्या