Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

चांदवडला पोलीस हवालदार 10000 रु ची लाच घेताना लाचलुचपत च्या जाळ्यात.

 

चांदवडला पोलीस हवालदार 10000 रु ची लाच घेताना लाचलुचपत च्या जाळ्यात.


जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार 
 चांदवड: तक्रारदार-पुरुष, वय 59 वर्ष यांनी धुळे ला प्र वि येथे तक्रार दाखल केली होती त्यानुसार श्री. हरी जानू पालवी,वय-51 वर्ष,पोलीस हवालदार ब.नं. 429, वर्ग 3, नेमणूक चांदवड पोलीस स्टेशन,ता. चांदवड,जि.नाशिक यांनी 20,000/-रु. दि.01/06/2023 मागणी केली व 10000 रु लाच स्विकारली.

लाचेचे कारण -यातील तक्रारदार यांचे त्यांच्या भावासोबत शेत जमिनीच्या वहीवाटीवरून वाद झाल्याने चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रारदार व त्यांच्या भावाचे एकमेकाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. तक्रारदार यांच्याकडून दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीतांविरुद्ध वाढीव कलम लावून आरोपींवर कारवाई करण्याकरिता तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 20,000/- रुपये लाचेची मागणी  करून त्यातील पहिला हप्ता रुपये 10,000/- लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना आलोसे रंगेहात मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

या कारवाईत सापळा अधिकारी
मंजितसिंग चव्हाण,(पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे. पर्यवेक्षण अधिकारी),श्री अभिषेक पाटील,(पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि.,धुळे.)
सापळा पथक राजन कदम,संतोष पावरा, रामदास बारेला ,मकरंद पाटील ,गायत्री पाटील, प्रवीण पाटील ,चालक जगदीश बडगुजर सर्व नेमणूक ला.प्र.वि.धुळे यांनी सापळा यशस्वी केला. 
सदरचा सापळा हा मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो, 
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
मा.श्री.नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
यानंतर धुळे युनिटने सांगितले की सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या