Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात कधीही जातीय तेढ नाहीच,दिपक गोगड.

 


मनमाड शहर अत्तार संघटना तर्फे ईद मिलन व शिरखुर्मा कार्यक्रम संपन्न,

जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.8888509003
मनमाड शहरात कधीही जातीय तेढ निर्माण झाला नाही व यापुढेही होणार नाही.  रमजान ईद निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती शहर सचिव व अत्तार संघटना शहर अध्यक्ष सद्दाम अत्तार यांच्यातर्फे  दावते ए शिरखुर्मा कार्यक्रम जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण असुन असाच सामाजिक सलोखा कायम राहील, असा विश्वास मा.दिपक गोगड यांनी व्यक्त केला.

मनमाड शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती शहर सचिव व अत्तार संघटना शहर अध्यक्ष सद्दाम अत्तार यांनी रमजान ईद निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवाचे ईद मिलन अर्थात दावत ए शिरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी.  मिर्जा अहमद बेग (बेग चाचा )यांनी  असे सामाजिक कार्यक्रम राबविले जावे आपले मनोगत व्यक्त केले तसेच, गुरुद्वारा प्रबंधक बाबाजी यांचे प्रतिनिधी गुरमित कांत साहेब यांनी  देशाची बंधुता ही राष्ट्रीय एकात्मताची आत्मा आहे, असे सामाजिक उपक्रम घेऊन आपण राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्याचे कार्य अत्तार संघटने मार्फत केले आहे  मनोगत व्यक्त केले तसेच पल्लवी मंगल कार्यालय संस्थापक विकास काकडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून सद्दाम अत्तार व अत्तार संघटनेचे आभार मानले, तसेच .

याप्रसंगी व्यासपीठावर बेग चाचा, गुरुद्वारा प्रबंधक बाबाजी साहेब यांचे प्रतिनिधी गुरूमित कांत साहेब,विकास काकडे, दिपक गोगड, राजेंद्र जाधव, बादशाह अत्तार,कादिर  शेख,मा.नगरसेवक‌.नाजिम शेख,आमिन पटेल,हबीब शेख,सादिक पठाण, सलिम अत्तार आदींसह मनमाड शहरातील व ईदगाह परिसरातील नागरिक व अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी युवा नेते.सलमान अत्तार, जाविद शेख, कादिर शेख,संतोष सातदिवे, अमोल दंडगवाळ, इस्माईल पठाण,शकुर शेख, आदी उपस्थित  मान्यवर यांचे संद्दाम अत्तार यांच्यातर्फे गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आले रमजान ईदच्या  शुभेच्छा देताना दिपक गोगड म्हणाले, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास (रोजा) धरतात. व रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतो सर्व समाजातील धर्मगुरू व शासकीय राजकीय विविध मान्यवर  यावेळी अल्लाहकडे समाजातील एकोप्याची, शांतता व सुरक्षेसाठी प्रार्थना (दुवा) करत असतात. मनमाड शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आज या रमाजान ईदच्या निमित्ताने दावते ए शिरखुर्मा कार्यक्रम अतिशय स्तुत्य कार्यक्रम  मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती शहर सचिव व अत्तार संघटना शहर अध्यक्ष सद्दाम अत्तार यांनी केला आहे. असाच सामाजिक सलोखा तालुक्यात कायम राहील. मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रश्नात कायम आपण व आलेले व्यासपीठ मान्यवर आपल्याबरोबर आहोत.  गोगड यांनी सांगितले.

याप्रसंगी गुरूमित कांत साहेब, विकास काकडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शेख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी नईम शेख ,सुल्तान पठान,अज़ीम खान, कबीर बागवान,सलमान पटेल ,आमजत पठान ,मोनू अत्तार, इमरान अत्तार,रईस शेख,मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती गोल्डन ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या