Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महावितरणचा भोंगळ कारभार ! ऐण उन्हाळ्यात मनमाड शहरातील नागरिक अंधारात.

 



जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार 

मनमाड (ता.३०)महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मनमाड शहरातील परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार - पाच दिवसांपासून निम्मे शहर अंधारात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.  (ता. ३०) रात्री  पूर्ण गाव अंधारात सापडला आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या गेंड्याच्या कातडीच्याअधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्‍कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्‌द्‌याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.  - गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी असल्यामुळे हे उपकेंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. . वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या