जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार.

मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) करतात. महिन्याच्या शेवटी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या रमजान ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी झाल्याने शनिवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी सकाळी विशेष रमजान ईद नमाजासाठी शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनमाड शहर खतिब -ईमाम जामा मस्जिद मौलाना असलम रजवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी ८:४५वाजता ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण करून खुदबा करण्यात आला.व सद्या देशातली परिस्थती बघता, अल्लाह ताआला आमच्या भारत देशाला आपल्या आमान मध्ये ठेव, देश्यात अमन भाईचारा राहूदे, आमच्या देशात शांतता नांदावी अशी समुदयिक दुवा करण्यात आली, 

या वेळी नांदगाव तालुका आमदार.सुहास अण्णा, कांदे नाशिक ग्रामीण शिव सेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, मनमाड नगर परिषद प्रशासक मुख्य अधिकारी सचिन कुमार पटेल, पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, यांच्या सह प्रशासकीय व राजकीय पदाधिकारी यांच्यातर्फे मौलाना असलम रजवी साहेब यांचे पुष्पहार व शाल देऊन सत्कार केले व आलेल्या मुस्लिम समुदाय यांना ईद च्या शुभेच्छा दिल्या तसेच आलेल्या सर्व शासकीय व राजकीय मान्यवर अधिकारिंचे जामा मस्जिद ट्रस्ट तर्फे पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आले.

मनमाड नगरपरिषद तर्फे ईदगाह मैदानाच्या चारी बाजूने लोखंडी जाळी व मंडप कनात लावण्यात आले होते तर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. तसेच मनमाड शहरात हिंदू मुस्लिम बांधव गळाभेट घेत एक मेकांना रमजान ईद चे शुभेच्छा देतांना दिवसभर दिसत होते,