Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

शासकीय कार्यालयामध्ये दहा वर्षा पासून, लोकांच्या घरून विद्दूत पुरवठा,.? कार्यालया चे सन 2012 पासून विद्दूत पुरवठा खंडीत, माहिती अधिकारात झाले उघड,

 


मनमाड :- मनमाड शहरातील शासकीय धान्य गोदामा चे वीज बिल थकीत असल्याने, विद्दूत कंपनी तर्फे सन 2012 मध्ये वीज कनेक्शन कापून, विद्दूत पुरवठा खंडीत करून वीज मिटर हे PD करण्यात आलेले आहे, विद्दूत पुरवठा सुरळीत व्हावा या साठी कार्यालया तर्फे तहसीलदार साहेब नांदगाव व जिल्हा पुरवठा विभाग यांना अनेक पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे, 

तरी देखील तहसीलदार साहेब नांदगाव यांनी दखल घेतलेली नाही असे निदर्शनास येते आहे,

मनमाड शहर शासकीय धान्य गोदामात गोर-गरिबांना मिळणारा लाखो टन धान्य हा साठवणूक करून असतो, परंतु शासकीय गोडाऊन व कार्यालय मध्ये विद्युत्त पुरवठा नसल्याने उंदीर घुशी यांची उपाय योजना करने नाही से झाले आहे, त्या मुळे धान्य वाया जाण्याची शक्यता नाकारताच येत नाही,? 

कारण नियमानुसार गोडाऊन तपासणी विशेष अधिकारी मार्फत गोडाऊन तपासणी दर्मीयन उंदीर वाढले आहे व उंदीरावर उपाय योजना केल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे गोडाऊन तपासणी अधिकार अभिलेखत स्पष्ट अभिप्राय नोंदविलेले आहे, तरी देखील दहा वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा जबाबदार अधिकारी तर्फे योग्य पाऊले उचल्ल्या गेलेली नाही, असे निदर्शनास येत आहे,

मनमाड शहर शासकीय धान्य गोडाऊन मध्ये लाखो टन धान्य आहे परंतु रात्री अंधाराचा साम्राज्य असल्या मुळे,गोर-गरिबांचं शासकीय धान्य चोरीस जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही,

जबाबदार अधिकारिंनी तात्काळ कारवाई करावी असे जन आवाज न्यूज तर्फे अपेक्षा व्यक्त केली जात आहे,

वीज बिल भरा अन सहकार्य करा म्हणत, गोर-गरिबांचे जर किरकोल विद्दूत बिल थकीत असले तर त्यांचे वीज कनेक्शन कापून विद्दूत पुरवठा खंडीत करण्यात येतो, ना ईलाजाने गरिबांनी वीज चोरी केल्यास मोठ्या मोठ्या रक्कमेचे दांडाच्या पावत्या देण्यात येतात, दंड देखील वसूल करण्यात येतो, ते वसूल करण्यात आलेच पाहिजे, 

परंतु अत्ता एका शासकीय कार्यालयानेच विद्दूत कनेक्शन न घेता सलग दहा वर्ष वीजेचा वापर केला आहे, यावर महाराष्ट्र वि वी कं,मनमाड ही काही कारवाई करणार का.? असा प्रश्न नागरिकांनतर्फे उपस्थित केला जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या