Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे महिलां व मुलींसाठी भव्य सायकल स्पर्धा .

 

जन आवाज न्युज संपादक. आफरोज अत्तार 

मनमाड.जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी ने रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी मुली व महिलांसाठीभव्य अशी सायकल स्पर्धा आयोजित केली आहे,तरी जास्तीत जास्त मुलींनी व महिलांनी या स्पर्धेत भाग घेऊन,महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवून द्यावे असे


आवाहन,सायक्लोथन 2023 या स्पर्धेचे प्रोजेक्ट शेअर पर्सन ला डॉ निलेश राठी,ला डॉ अर्चना राठी,ला गणेश हडपे,ला सौ संगीता कदम यांनी केले आहे,स्पर्धकांनी स्वतःची सायकल घेऊन यावी,सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,तसेचदोन गटातील प्रथम तीन स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,लायन्स गार्डन आ.यु .डी.पी ते लासलगाव फाटा कमान व परत लाईन चिल्ड्रन गार्डन आ.यु.डी.पी येथपर्यंतया सायकली स्पर्धेचा मार्ग आहे तरी सर्व स्पर्धकांनी सकाळी सात वाजता लायन्स चिल्ड्रन गार्डन आ.यु.डी.पी येथे जमावे असे आवाहनलायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे अध्यक्षा ला सौ वैशाली वाणी,सचिव ला रेखा येणारे,खजिनदार ला सुचिता खताळ यांनी केले आहे,याच ठिकाणी आहारतज्ञ सौ जंगम मॅडम यांचे महिलांसाठी स्वास्थ्यवर्धक आहार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे,लायन्स क्लब आयोजितपीस पोस्टर कॉन्टॅक्ट या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ही याच ठिकाणी होणार आहे,तरी जास्तीत जास्त महिला व मुलींनी या सायकल स्पर्धेत भाग घेऊन महिला सशक्तिकरण व सबलीकरण दाखवून द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ठिकाण---लायन्स गार्डन आ.यु .डी.पी गणपती मंदिराशेजारी वेळ सकाळी 7 वाजता,,,दिनांक 12 मार्च 2023 ,रविवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या