जन आवाज न्युज. संपादक आफरोज अत्तार
मनमाड.सालाबाद प्रमाणे यंदाही मुस्लिम समाजाचे पवित्र रमजान महिना 23.3.2023 रोजी प्रारंभ होत आहे,महिना भर मुस्लिम समाज शहराच्या मुख्य मस्जिद नगिना मस्जिद जामा मस्जिद या ठिकाणी मोठया संख्येने मुस्लिम बांधव ,नमाज पठन ला आवर्जुन उपस्थित असतात.
पवित्र रमजान महिन्या मध्ये उपासक रात्रि पहाटे 4.30.वाजता,उपास सेहरी बंधन करुण फजर ची नमाज अदा करतात.त्या नंतर जोहर असर नमाज अदा करतात व सायंकाळी उपासक अफतारी सोडण्यापुर्वी खजुर, फळं, फ्रुट इत्यादि खाद्य पदार्थ घेण्याकरीता समाज बांधव मोठया संख्येने नगिना मस्जिद ते नगर पालिका या मेन रोडवर गजबजलेला असतो,या अनुषंगाने एकेरी वाहतूक मार्ग करण्यात यावे आणि पोलिस बंदोबस्त देण्यात यावे.मनमाड शहर पोलिस निरीक्षक.बाळासाहेब थोरात यांना मुस्लिम समाजाच्या वतीने अभिनंदन व निवेदन देण्यात आले.यावेळी फुले शाहु आंबेडकर मुस्लिम विचार मंच मनमाड.कार्याध्यक्ष.फिरोज शेख, अध्यक्ष.मिर्झा अहमद बेग.सचिव विलास अहिरे. समाजसेवक जावेद शेख ईमेज. वसिम तांबोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या