रेल्वे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार; IRCTC ने घेतला मोठा निर्णय.
रेल्वे प्रवाशांना आता पिण्याच्या पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. कारण रेलनीरचा पुरवठा काही स्थानकांसाठी स्थगित केला जाणार आहे.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
मुंबई : उन्हाच्या झळा फेब्रुवारीच तीव्र जाणवत असताना, रेल्वेच्या प्रवाशांना आता पिण्याच्या पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 'आयआरसीटीसी'ने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील निवडक रेल्वे स्थानकांत रेलनीरचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या स्थानकांमधील रेल्वेने निश्चित केलेले खासगी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागणार आहे.
रेल्वे स्थानकांवर पाणपोईंची दुरवस्था आहे. एका रुपयांत पाणी देणारे वॉटर व्हेडिंग मशीनही बंद आहेत. रेल्वे स्थानकांबाहेर खासगी कंपन्यांच्या एक लीटर बाटलीबंद पाण्यासाठी प्रवाशांना २० रुपये मोजावे लागतात. स्थानकातील रेलनीरचे बाटलीबंद पाणी १५ रुपयांना उपलब्ध होते. यामुळे रेलनीरला प्रचंड मागणी आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात रेल्वे स्थानकांतील रेलनीरची मागणी वाढते. यामुळे अंबरनाथ येथील रेलनीर कारखान्यावरील भार कमी करण्यासाठी मध्य प्रदेशस्थित मानेरी येथील रेलनीरचे उत्पादन-वितरण वाढवण्यात येणार आहे. दरम्यान अंबरनाथ कारखान्याच्या वार्षिक देखभालीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत रेलनीरचा पुरवठा स्थगित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील हार्बर मार्गावरील सर्व स्थानके, मुख्य मार्गावरील ठाणे ते इगतपुरी/लोणावळा विभाग, भुसावळ, नाशिक रोड आणि मनमाड आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार, वापी आणि वलसाड या स्थानकांमधील रेलनीरचा पुरवठा थांबवण्यात येणार आहे, असे आयआरसीटीने मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. देखभाल-दुरुस्तीचा कालावधी वाढल्यास ८ मार्चनंतर देखील पुरवठा स्थगित राहण्याची शक्यता आयआरसीटीसीकडून वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान देखभाल-दुरुस्तीचे काम वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास रेलनीरचा पुरवठा पूर्ववत करण्यात येईल. यामुळे संबंधित रेल्वेने बाटलीबंद पाण्याची अन्य व्यवस्था करावी, अशा सूचना देखील आयआरसीटीसीने रेल्वेला दिलेल्या आहेत.
आयआरसीटीसीने ऑक्टोबरमध्ये कल्याण आणि त्यापुढील स्थानकांत रेलनीरचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवली होती. यावेळी रेल्वेने निश्चित केलेल्या अन्य खासगी बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यास मुभा दिलेली होती.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या